शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
2
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
3
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
4
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
5
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
6
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
7
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
8
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
9
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
10
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
11
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
12
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
13
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
14
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
15
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
16
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
17
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
18
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
19
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय भाषांप्रति आवड व स्वाभिमान जागवा

By admin | Updated: June 15, 2015 02:55 IST

भारतीय भाषांप्रति आवड व स्वाभिमान वाढवा. यातून चेतना निर्माण होईल तेव्हा कुठे मातृभाषेत बोलताना वाटणारा कमीपणा,....

हिंदी दिनानिमित्त आयोजित ‘विचार सत्रा’त जनार्दन द्विवेदी यांचे आवाहन नागपूर : भारतीय भाषांप्रति आवड व स्वाभिमान वाढवा. यातून चेतना निर्माण होईल तेव्हा कुठे मातृभाषेत बोलताना वाटणारा कमीपणा, मनात निर्माण होणारा न्यूनगंड, अशा सर्व समस्या आपोआपच दूर होतील, असे आवाहन अ.भा. काँग्रेस समितीचे सरचिटणीस व राज्यसभा सदस्य व शिक्षणतज्ज्ञ जनार्दन द्विवेदी यांनी केले. बहुतांश भारतीय भाषांचे हे वैशिष्ट्य आहे. ज्या भाषेत जे बोलले जाते तेच लिहिले जाते. त्यामुळे या वैज्ञानिक भाषा आहेत. अशा वैज्ञानिक भाषा ज्या देशात असतील त्या देशाला अकारण चिंता करण्याची गरज नाही, असा विश्वासही त्यांना व्यक्त केला. लोकमत समाचारतर्फे नीरीच्या विशेष सहकार्याने ‘हिंदीच्या प्रचार-प्रसारासाठी केले जाणारे प्रयत्न व आम आदमीची भूमिका’ या विषयावर रविवारी नीरीच्या सभागृहात विचार सत्र आयोजित करण्यात आले. यावेळी मुख्य वक्ते म्हणून द्विवेदी बोलत होते. अध्यक्षस्थानी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू गिरीश्वर मिश्र होते. राज्यसभा सदस्य व लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू सिद्धार्थविनायक काणे , नीरीचे संचालक डॉ. सतीश वटे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. हिंदीच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील असणारे काँग्रेसचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी म्हणाले, भारतीय भाषांना महत्त्वाचे स्थान मिळवून देण्यात व्यवस्थेची नाही तर सामान्य माणसाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यामुळेच भारतीय भाषा जिवंत आहेत. कमी लेखण्याच्या वृत्तीमुळेच हिंदी व अन्य भाषांची अशी दशा झाली आहे. युनेस्कोच्या एका अहवालात म्हटले आहे की, जगात सुमारे ७००० भाषा आहेत. त्यापैकी ५००० भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. जगातील ९२ टक्के लोक ५ टक्के भाषा बोलतात. प्रश्न इंग्रजीचा नाही तर प्रवृत्तीचा आहे. हिंदी व भारतीय भाषांचा जे वापर करतात, त्याच भाषेत ते स्वप्न पाहतात. त्यांच्यामुळेच आपल्या भाषा पुढेही जिवंत राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘विचार सत्र’चे अध्यक्ष म्हणून बोलताना कुलगुरू गिरीश्वर मिश्र म्हणाले, आपल्या भाषेत संवाद साधताना, व्यवहार करताना कोणताही कमीपणा किंवा लाज वाटू नये. आपल्या भाषांबाबत आपण मनात अनावश्यक भीती निर्माण केली आहे. ती भीती बाहेर काढावी लागेल. भाषेवर संस्कार करून ते शक्य आहे. सद्यस्थितीत हिंदी व भारतीय भाषांना आपल्यापासून दूर करण्याचा कट रचला जात आहे. सध्या समाजात हिंदी व इंग्लिशचे मिश्रण असलेली ‘हिंग्लिश’ च्या रूपात आणखी एक भाषा आली आहे. त्यामुळे आता हिंदी भाषेचाच नव्हे तर हिंदी समाजाच्या अस्मितेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. लोकशाहीत लोकमत महत्त्वाचे असते. भाषेबाबत आवश्यक असलेले प्रश्न लावून धरत वृत्तपत्राच्या रूपात ‘लोकमत’ आपली भूमिका चोखपणे बजावत असल्याचेही त्यांनी सांगितले. विशेष अतिथी म्हणून बोलताना खा. विजय दर्डा म्हणाले, हिंदी कोणत्या एका क्षेत्रात किंवा एका बोलीपासून विकसित झालेली भाषा नाही. तिच्या विकासात उर्दूपासून ते भारतातील बऱ्याच भाषा व बोलींचे योगदान आहे. त्यामुळेच स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्रीय एकतेच्या रूपात हिंदी राष्ट्रभाषा म्हणून समोर आली. मात्र, स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही शासकीय कामकाजाची भाषा म्हणून हिंदीला ते स्थान प्राप्त झाले नाही जो तिचा संवैधानिक हक्क होता. महाराष्ट्राने हिंदीची प्रचंड सेवा केली आहे. राष्ट्रीय एकतेच्या हितासाठी मराठी भाषिकांनी हिंदीची केलेली सेवा इतर राज्यांसाठी अनुकरणीय आहे. हिंदी समृद्ध करण्यात, तिच्या गद्य व कवितेत परिपक्वता आणण्यात मराठीपासून ते तेलगू, बांगला तसेच अन्य भारतीय भाषांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. त्यामुळेच ही भाषा राष्ट्रीय एकात्मतेच्या अभिव्यक्तीच्या रूपात समोर आली आहे. संचालन लोकमत समाचारचे संपादक विकास मिश्र यांनी केले. नीरीचे संचालक डॉ. सतीश वटे यांनी आभार मानले. कार्यक्रमात शहरातील साहित्यिक व हिंदीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी खा. विजय दर्डा यांनी काँग्रेसचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांचे स्वागत पुष्पगुच्छ व ‘फ्रीडम आॅफ प्रेस’ च्या प्रतिमेची प्रतिकृति देऊन केले. कुलगुरू गिरीश्वर मिश्र यांचे स्वागत लोकमत समूहाचे सहायक उपाध्यक्ष नीलेश सिंह, कुलगुरू सिद्धार्थविनायक काणे यांचे स्वागत लोकमत समाचारचे प्रॉडक्ट हेड मतीन खान, नीरीचे संचालक डॉ. सतीश वटे यांचे स्वागत उपमहाव्यवस्थापक (प्रोजेक्ट इम्प्लीमेन्टेशन) आशीष जैन व खा. विजय दर्डा यांचे स्वागत औरंगाबाद आवृत्तीचे कार्यकारी संपादक अमिताभ श्रीवास्तव यांनी केले. (प्रतिनिधी)