शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

दिल्लीतील सायबर टोळीचा सदस्य लागला नागपूर पोलिसांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 11:51 PM

सेवानिवृत्त महिला प्राचार्याची २४ लाखाने फसवणूक करणाऱ्या दिल्लीतील सायबर गुन्हेगारांच्या टोळीतील एक सदस्य पोलिसांच्या हाती लागला. सायबर सेलने दिल्लीतील मंडोली गावात धाड टाकून २२ वर्षीय सनवर खान नफीज खान याला अटक केली आहे. अनेक दिवसानंतर दिल्लीतील कुण्या सायबर टोळीतील सदस्य पोलिसांच्या हाती लागला आहे.

ठळक मुद्देसेवानिवृत्त महिला प्राचार्याला २४ लाखाने फसविले होते : वर्षभरानंतर मिळाले पोलिसांना यश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सेवानिवृत्त महिला प्राचार्याची २४ लाखाने फसवणूक करणाऱ्या दिल्लीतील सायबर गुन्हेगारांच्या टोळीतील एक सदस्य पोलिसांच्या हाती लागला. सायबर सेलने दिल्लीतील मंडोली गावात धाड टाकून २२ वर्षीय सनवर खान नफीज खान याला अटक केली आहे. अनेक दिवसानंतर दिल्लीतील कुण्या सायबर टोळीतील सदस्य पोलिसांच्या हाती लागला आहे.रामनगर निवासी शीला महापात्रा यांना २२ सप्टेंबर २०१७ रोजी मोबाईलवर फोन आला होता. त्यांना एचडीएफसी जीवन विमा पॉलिसीमध्ये साडेतीन लाखाचा बोनस मिळणार होता. फोन करणाऱ्याने महापात्रा यांना १४ लाख ८० हजार रुपयाचे बोनस देण्याचे आमीष दिले. यासाठी त्याने माहापात्रा यांना नाममात्र ५ हजार रुपये शुल्क भरण्यास सांगितले. ही रक्कम भरल्यानंतर त्याने महापात्रा यांना आपल्या जाळ्यात ओढण्यास सुरुवात केली. त्याने जीएसटी, आयकर आणि इतर वेगवेगळ्या प्रकारचे शुल्क सांगून महापात्रा यांच्याकडून २४ लाख ३८ हजार ९४५ रुपये वेगवेगळ्या खात्यात जमा करायला लावले. यानंतरही बोनसची रक्कम काही मिळाली नाही. शेवटी त्यांना संशय आला. त्यांनी आपल्या मुलीला सर्व प्रकार सांगितला. मुलीच्या माध्यमातून सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्यात आली.पोलिसांनी आरोपीच्या बँक खात्याची माहिती काढली. त्यांनी बँकेला मॅसेज पाठवून १३ लाख ८५ हजार ४०३ रुपये फ्रीज करून घेतले. पोलीस मोबाईल नंबरच्या आधारावर आरोपीचा शोध घेत होते. त्यांना आरोपी दिल्लीतील हर्षविहारमधील मंडोली येथील रहिवासी असल्याचे आढळून आले. पोलिसांची चमू दिल्लीला पोहोचली. ११ डिसेंबर रोजी आरोपी सनवरला पकडण्यात आले.सनवर हा या टोळीचा एक सदस्य आहे. या टोळीचे दिल्लीतील लक्ष्मीनगर आणि उत्तर प्रदेशातील नोएडा येथे कॉल सेंटर आहे. तेथे ८ ते १० युवक काम करतात. ते फोन करून लोकांना आपल्या जाळ्यात ओढतात. या टोळीकडे अनेक खाते आहेत. त्यात ग्राहकांना रुपये जमा करण्यास सांगितले जाते. सनवरला नागपुरात आणून १७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत घेण्यात आले आहे.ही कारवाई डीसीपी श्वेता खेळकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भानुदास पिदूरकर, पीएसआय बलराम झाडोकर, कर्मचारी संतोष सिंह ठाकूर आणि अमित भुरे यांनी केली.महिला आहे मूख्य सूत्रधारया टोळीची मूख्य सूत्रधार एक महिला आहे. ती सनवर व इतर साथीदारांच्या मदतीने अनेक दिवसांपासून ही टोळी चालवीत आहे. सनवर पहिल्यांदाच पोलिसांच्या हाती लागला. महिला पकडल्या गेल्यास आणि त्यांच्या बँक खात्याची माहिती मिळाल्यास, या टोळीच्या खुलाचा होऊ शकतो.

 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमArrestअटक