शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
2
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
3
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
4
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
6
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
7
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
8
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
9
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
10
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
11
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
12
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
13
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
14
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
15
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
16
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
17
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
18
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
19
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
20
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका

भागवत व ओवेसी यांचे हातात हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2016 03:19 IST

‘भारत माता की जय’ म्हणू नका असे कुराणमध्ये कुठेच लिहिलेले नाही. सरसंघचालक मोहन भागवत व एमआयएमचे अध्यक्ष ओवेसी यांचे हातात हात घालून काम सुरू आहे.

दिग्विजयसिंह यांची टीका : पीडीपीची साथ भाजपला कशी चालते ?नागपूर : ‘भारत माता की जय’ म्हणू नका असे कुराणमध्ये कुठेच लिहिलेले नाही. सरसंघचालक मोहन भागवत व एमआयएमचे अध्यक्ष ओवेसी यांचे हातात हात घालून काम सुरू आहे. या दोघांचीही ‘फूट पाडा व राज्य’ करा अशी कट्टरवादी विचारधारा आहे. काँग्रेसने तर ‘भारत माता की जय’ या नाऱ्यावर देशाच्या स्वातंत्र्याचा लढा लढला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘डिस्कवरी आॅफ इंडिया’ मध्ये भारत ‘माता की जय’ची केलेली व्याख्या संघ व भाजपला समजविण्याची वेळ आली आहे, असा चिमटा अ.भा. काँग्रेस समितीचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी काढला.पक्षाच्या आढावा बैठकीसाठी नागपुरात आले असता सिंह यांनी भाजप व संघ परिवारावर सडकून टीका केली. सिंह म्हणाले, जेएनयूमध्ये पाकिस्तानच्या समर्थनार्थ नारे दिले नसतानाही केवळ साम्यवादी विचाराचा असल्यामुळे कन्हैया कुमारला अटक करण्यात आली. मात्र, संसदेवर हल्ला करणाऱ्या अफजल गुरूचे समर्थन करणाऱ्या पीडीपीला जम्मू काश्मीरमध्ये सरकार बनविण्यासाठी भाजप कशी काय साथ देत आहे, हे भागवत यांनी स्पष्ट करावे. संविधान व आरक्षणाचा विरोध करणारी भाजपा आता डॉ. आंबेडकरांना आपलेसे करू पाहत आहे. एकीकडे भागवत म्हणतात की आरक्षणाचा पुनर्विचार व्हावा, तर दुसरीकडे पंतप्रधान मोदी म्हणतात आरक्षण लागू राहील. त्यामुळे कोण खरे बोलत आहे, हे या नेत्यांनी आधी स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेसचे टार्गेट मोहन भागवत नसून संघाची विचारधारा आहे. भागवत यांच्याशी आपली कुठलीही व्यक्तिगत लढाई नाही. मात्र, हिंसा, द्वेष पसरविणाऱ्या विचारधारेला आपला विरोध सुरू राहील, असेही त्यांनी सांगितले. उत्तराखंडमध्ये भाजपने पक्षांतरबंदी कायद्याचे पूर्णपणे उल्लंघन केले आहे. स्वत:कडे बहुमत असल्याचा दावा भाजपने केला, मात्र ते सिद्ध न करता राष्ट्रपती राजवट लागू केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या म्हटल्याने देश काँग्रेसमुक्त होणार नाही. भाजपमध्ये हिंमत असेल तर उत्तराखंडमध्ये निवडणूक घेऊन दाखवावी, असे आव्हान त्यांनी दिले.(प्रतिनिधी)फडणवीसांवरील आरोपांवर ठाममहाराष्ट्राच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) चे अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत. त्यांनी अ‍ॅक्सिस बँकेच्या वरळी शाखेतच बँक खाती उघडण्याचा आदेश जारी केला होता. यात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप सिंह यांनी केला होता. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सिंह यांना नोटीस बजावली होती. यावर बोलताना सिंह यांनी आपण आरोपांवर ठाम असल्याचे सांगितले. मी नोटीसीला उत्तर देत नाही. न्यायालयात उत्तर देईल. गडकरींनीही यापूर्वी नोटीस दिली होती. कायदेशीर लढाई लढतो आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. आपणही दहा वर्षे मुख्यमंत्री राहिलो आहे. फडणवीस यांनी अशी कामे करू नयेत, नाहीतर ते फसतील, असा सल्लावजा टोला त्यांनी लगावला.