नागपुरातील एम्प्रेस मॉल नाल्यावरील दुकानांवर हातोडा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 12:12 AM2020-01-03T00:12:45+5:302020-01-03T00:13:26+5:30

प्रवर्तन विभागाच्या पथकाने शहरातील रस्ते आणि फूटपाथ अतिक्रमणमुक्त करण्याच्या कारवाईला बुधवारी धडाक्यात सुरुवात केली. पहिल्या दिवशी दीडशेहून अधिक अतिक्रमण हटविण्यात आले.

Hammers at Empress Mall drain shops in Nagpur | नागपुरातील एम्प्रेस मॉल नाल्यावरील दुकानांवर हातोडा 

नागपुरातील एम्प्रेस मॉल नाल्यावरील दुकानांवर हातोडा 

googlenewsNext
ठळक मुद्देदुसऱ्या दिवशीही अतिक्रमण हटाव मोहीम जोरात : शंभराहून अधिक अतिक्रमणाचा सफाया

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रवर्तन विभागाच्या पथकाने शहरातील रस्ते आणि फूटपाथ अतिक्रमणमुक्त करण्याच्या कारवाईला बुधवारी धडाक्यात सुरुवात केली. पहिल्या दिवशी दीडशेहून अधिक अतिक्रमण हटविण्यात आले. आज गुरुवारी शंभराहून अधिक अतिक्रमणाचा सफाया केला. महाल झोनच्या पथकाने एम्प्रेस सिटी मॉल ते गांधीसागर तलावाच्या फूटपाथवरील अतिक्रमण हटविले. तसेच येथील नाल्यावर अतिक्रमण करून उभारण्यात आलेली तीन दुकाने हटविण्यात आली. एक ट्रक साहित्य जप्त करून चार हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
अतिक्रमण कारवाई प्रवर्तन विभागाचे सहायक आयुक्त अशोक पाटील, प्रवर्तन निरीक्षक संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनात नितीन मंथनवार, भास्कर माळवे, शाबाद खान, विशाल ढोले, आतिश वासनिक आदींनी केली.
मंगळवारी झोन : पथकाने पागलखाना चौक ते फरस चौक ते झेंडा चौक (झिंगाबाई टाकळी) या दरम्यानच्या फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्यात आले. विक्रेत्यांकडून १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
आसीनगर झोन : प्रवर्तन विभागाच्या पथकाने कामठी रोडवरील इंदोरा चौक लगतच्या फूटपाथवर भरणारा फर्निचर बाजार हटविण्यात आला तसेच एक चहाटपरी हटविण्यात आली. लाल गोदाम चौक येथील दोन चहाटपºया, दोन वेल्डिंग दुकानांचे अतिक्रमण काढण्यात आले. ग्रामीण आरटीओ कार्यालय परिसरातील तीन लोखंडी ठेले तोडण्यात आले तसेच अस्थायी शेड तोडण्यात आले. तीन ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. या परिसरातील ६५ अतिक्रमणांचा सफाया करण्यात आला. सहायक आयुक्त हरीश राऊ त यांच्य मार्गदर्शनात उपअभियंता अजय पाझारे यांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली. यात एक ट्रक माल जप्त करण्यात आला.
धंतोली झोन
धंतोली झोन क्षेत्रातील बैद्यनाथ चौक ते अशोक चौक, मेडिकल चौक ते राजाबाक्षा मैदान परिसर परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले. चार ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. सहायक आयुक्त किरण बडगे यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.

Web Title: Hammers at Empress Mall drain shops in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.