लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर सुधार प्रन्यास व महापालिका यांनी संयुक्तपणे मंगळवारी रस्त्यावरील व रस्त्यांच्या कडेला अनधिकृत धार्मिक स्थळांवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविली. यात पाच अनधिकृत मंदिर हटविण्यात आले.यात हनुमान मंदिर,आयसोलेशन दवाखान्याजवळ, इमामवाडा, संकटमोचन हनुमान मंदिर, ग्रेट नाग रोड, टिंबर मार्केट, नागोबा मंदिर, वसंतनगर, बाबुलखेडा विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, राजेंद्र मेडिकलच्या मागे, भगवाननगर, जय माता दी मंदिर, संतोष राठी यांच्या घराजवळ, पार्वतीनगर आदींचा समावेश आहे. ही कारवाई दोन टिप्पर आणि दोन जेसीबीच्या साह्याने दुपारी ३ ते सायकांळी ७ दरम्यान करण्यात आली. विभागीय अधिकारी (दक्षिण) अविनाश बडगे, नासुप्रचे क्षतिपथक प्रमुख मनोहर पाटील, सहा. आयुक्त सिंग, प्रल्हाद पाटील यांनी संयुक्तरीत्या ही कार्यवाही केली. अजनी व इमामवाडा पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.
नागपुरात अनधिकृत पाच मंदिरांवर हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 00:39 IST
नागपूर सुधार प्रन्यास व महापालिका यांनी संयुक्तपणे मंगळवारी रस्त्यावरील व रस्त्यांच्या कडेला अनधिकृत धार्मिक स्थळांवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविली. यात पाच अनधिकृत मंदिर हटविण्यात आले.
नागपुरात अनधिकृत पाच मंदिरांवर हातोडा
ठळक मुद्देअजनी व इमामवाडा पोलिसांच्या मदतीने कारवाई