शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील मेयो रुग्णालयालगतच्या अवैध घरांवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 23:57 IST

इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय व महिविद्यालयाच्या (मेयो) सुरक्षा भिंतीलगत अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या घरावर महापालिके च्या अतिक्रमण विरोधी पथकाने सोमवारी प्रचंड पोलीस बंदोबस्तात हातोडा चालविला. कारवाईला विरोध करण्यासाठी महिला जेसीबीच्या पुढे आल्या होत्या. परंतु स्थानिक नागरिकांच्या विरोधाला न जुमानता अतिक्रमण हटविण्यात आले.

ठळक मुद्देमनपाच्या पथकाची कारवाई : विरोधाला न जुमानता पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणाचा सफाया

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय व महिविद्यालयाच्या (मेयो) सुरक्षा भिंतीलगत अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या घरावर महापालिके च्या अतिक्रमण विरोधी पथकाने सोमवारी प्रचंड पोलीस बंदोबस्तात हातोडा चालविला. कारवाईला विरोध करण्यासाठी महिला जेसीबीच्या पुढे आल्या होत्या. परंतु स्थानिक नागरिकांच्या विरोधाला न जुमानता अतिक्रमण हटविण्यात आले.रुग्णालयाच्या भिंतीच्या बाजूला तीन फूट जागा मोकळी सोडण्यात आली होती. परंतु लगतच्या नागरिकांनी या जागेवर अतिक्रमण करून बांधकाम केले. अतिक्रमणासंदर्भात २००२ मध्ये प्रकरण न्यायालयात गेले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २०१७ मध्ये मेयोसमोरील अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले होते. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने ६ मार्चला कारवाई करून २० घरांचे अतिक्रमण हटविले होते. उर्वरित नागरिकांना अतिक्रमण हटविण्यास सांगितले होते. परंतु नागरिकांनी अतिक्रमण हटविले नाही. त्यामुळे सोमवारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त अशोक पाटील व अधीक्षक यादव जांभुळकर यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.या परिसरात अनेकांचे तीन मजल्याचे अवैध बांधकाम जेसीबी मशीनद्वारे पाडण्यात आले. याला परिसरातील नागरिकांनी प्रचंड विरोध केला. मात्र, कारवाईदरम्यान १४० पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा उपस्थित असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. यामध्ये मो. इब्राहिम, मेहफज पटेल, मो. मुजफ्फर, झियाउद्दीन असगर, मो. असलम, जिमल मो. शकील, मो. अयाज, मो. वहील, मो. शकील, मो. अशफाक, मो. साबीर, मो. इब्राहिम, मो. मुस्ताक आदी लोकांवर कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान गोंधळ घालणाऱ्यांनी अतिक्रमण हटविताना भेदभाव केला जात असल्याचा आरोप केला. काही जणांचे अतिक्रमण असूनही कारवाई करण्यात आलेली नाही तर काहींचे बांधकाम हटविण्यात आले.यावेळी मेयो रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. अनुराधा श्रीखंडे, जनसंपर्क अधिकारी डॉ. सागर पांडे, अतिक्रमण विभागाचे शाह, जमशेद अली, नितीन मंथनवार, संजय शिंगणे, शरद इरपाते, पोलीस विभागाचे अधिकारी राजरत्न बन्सोड, वैभव जाधव आदी उपस्थित होते.वेळ देऊनही अतिक्रमण काढले नाहीउच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १३ जानेवारी २०१७ रोजी मेयो रुग्णालयालगतचे अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले होते. सीमांकनाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ६ मार्च २०१६ रोजी कारवाई करण्यात आली होती. परंतु काही नागरिकांनी स्वत: अतिक्रमण हटविण्याची तयारी दर्शविली होती. परंतु त्यांनी अवैध बांधकाम न हटविल्याने कारवाई करावी लागली, अशी माहिती मेयो रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. सागर पांडे यांनी दिली.

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)Enchroachmentअतिक्रमण