शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात मसोबा, नागोबा मंदिरावर अतिक्रमणविरोधी पथकाचा हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 23:33 IST

रहदारीच्या व वर्दळीच्या भागात, तसेच फूटपाथवर अतिक्रमण करून उभारण्यात आलेली धार्मिक स्थळे हटविण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार सोमवारी महाल भागातील चिटणवीस वाड्यामागे असलेले मसोबा मंदिर व झेंडा चौक रोडवरील नागोबा मंदिरावर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने हातोडा चालविला.

ठळक मुद्देन्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाईपूजाअर्चा करून मूर्ती ताब्यात

आॅनलाईन लोकमतनागपूर : रहदारीच्या व वर्दळीच्या भागात, तसेच फूटपाथवर अतिक्रमण करून उभारण्यात आलेली धार्मिक स्थळे हटविण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार सोमवारी महाल भागातील चिटणवीस वाड्यामागे असलेले मसोबा मंदिर व झेंडा चौक रोडवरील नागोबा मंदिरावर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने हातोडा चालविला.मसोबा मंदिर १९८५ साली बांधण्यात आले होते. ६४ चौ.फूट जागेत उभारण्यात आलेल्या या मंदिराला ‘ब’ वर्गाचा दर्जा देण्यात आला होता. परंतु या मंदिरामुळे रहदारीला अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे अतिक्रमणविरोधी पथकाने सकाळी ११.३० च्या सुमारास मसोबा मंदिरात पूजाअर्चना करून मंदिराचे बांधकाम हटविले. पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.त्यानंतर पथकाने दुपारी १२.३० च्या सुमारास महाल भागातील झेंडा चौक रोडवरील नागोबा मंदिर हटविले. १९८० मध्ये या मंदिराचे बांधकाम करण्यात आले होते. २५ चौ. फू ट जागेत मंदिर उभारण्यात आले होते. दोन्ही मंदिरातील मूर्ती महापालिकेच्या पथकाने आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. काही दिवसापूर्वी लक्ष्मीनगर झोनच्या पथकाने व्हीएनआयटी प्रवेशद्वाराजळील धार्मिक स्थळाचे अतिक्रमण हटविले. तसेच धरमपेठ झोनने बोले पेट्रोल पंपाजवळील धार्मिक स्थळाचे अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली.शहराच्या विविध भागात अतिक्रमण करून उभारण्यात आलेलेली धार्मिक स्थळे हटविण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली. गेल्यावर्षी न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने कारवाईला सुरुवात केली होती. शहरातील काही अनधिकृत धार्मिक स्थळे हटविली. मंदिर, चबुतरे, ओटे, फलक आदी हटविण्यात आले होते. मिठानीम दर्ग्यासमोरील रस्ता दुभाजकावरील भाग मोकळा करण्यात आला होता़. वाहतुकीला अडथळा ठरणारी धार्मिक स्थळे हटविणार असल्याचे प्रतिज्ञापत्र महापालिकेने न्यायालयात सादर केले होते़ त्यानुसार अतिक्रमण करून उभारण्यात आलेली धार्मिक स्थळे पाडली जात आहेत.अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त अशोक पाटील, प्रवर्तन अधीक्षक यादव जांभूळकर, निरीक्षक संजय कांबळे, पथक प्रमुख प्रकाश पाटील, मोहरीर संजय शिंगणे यांच्यासह पथकातील अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :nagpurनागपूर