शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

हायटेंशन लाईनजवळच्या ७९ अवैध बांधकामांवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 21:48 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गेल्या २७ नोव्हेंबर रोजी दिलेल्या आदेशानुसार आतापर्यंत हायटेंशन लाईनजवळच्या ७९ अवैध बांधकामांवर हातोडा चालविण्यात आला आहे.

ठळक मुद्देमनपाचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र : कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या १७५ मालकांना नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गेल्या २७ नोव्हेंबर रोजी दिलेल्या आदेशानुसार आतापर्यंत हायटेंशन लाईनजवळच्या ७९ अवैध बांधकामांवर हातोडा चालविण्यात आला आहे. तसेच, वीज कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या १७५ मालमत्ता मालकांना नोटीस बजावून स्पष्टीकरण मागण्यात आले आहे.महानगरपालिकेने शुक्रवारी प्रतिज्ञापत्र दाखल करून उच्च न्यायालयाला ही माहिती दिली. हायटेंशन लाईनजवळ मंजूर आराखड्याचे उल्लंघन करून ४३२ बांधकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे ती बांधकामे धोकादायक झाली आहेत. त्यापैकी ७९ बांधकामे पाडण्यात आली आहेत. त्यात ३ धरमपेठ, १० हनुमाननगर, २ धंतोली, ५ नेहरूनगर, ६ गांधीबाग, १० सतरंजीपुरा, ७ लकडगंज, २६ आशिनगर तर, १० मंगळवारी झोनमधील बांधकामांचा समावेश आहे. याशिवाय मंजूर आराखडा नसताना हायटेंशन लाईनखाली ४६८ बांधकामे करण्यात आली आहेत. मनपा अधिकारी त्या बांधकामांची तपासणी करीत असून आतापर्यंत १७५ बांधकामांना अवैध ठरविण्यात आले आहे व संबंधित मालमत्ता मालकांना नोटीस बजावण्यात आली आहे.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने मनपाचे प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर घेऊन पुढील सुनावणी ८ जानेवारी रोजी निश्चित केली. ३१ मे २०१७ रोजी प्रियांश व पीयूष धर ही जुळी मुले नारा येथील एका सदनिकेच्या गॅलरीत खेळताना हायटेंशन लाईनच्या संपर्कात आली होती. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. उच्च न्यायालयाने त्या घटनेची गंभीर दखल घेऊन यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. या प्रकरणात अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर न्यायालय मित्र असून इतर पक्षकारांतर्फे अ‍ॅड. शशिभूषण वहाणे, अ‍ॅड. शैलेश नारनवरे, अ‍ॅड. सुधीर पुराणिक आदींनी कामकाज पाहिले.२२३ मालमत्ता मालक खर्च देण्यास तयारप्रतिज्ञापत्रानुसार, हायटेंशन लाईनचा धोका टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची २२३ मालमत्ता मालकांनी मागणी केली आहे. तसेच, यावर येणाऱ्या खर्चात योग्य तो वाटा देण्याची तयारी दर्शवली आहे. यासंदर्भात त्यांनी महानगरपालिकेला अर्ज सादर केले आहेत. महानगरपालिका त्या अर्जाची पडताळणी करीत आहे. त्यानंतर ते अर्ज पुढील कार्यवाहीसाठी महावितरणला पाठविले जाणार आहेत. महावितरणकडून खर्च व उपाययोजनेचा आराखडा सादर झाल्यानंतर त्यावर १० दिवसांत निर्णय घेतला जाईल व त्या निर्णयाची माहिती अर्जदारांना दिली जाणार आहे.पाच घरमालकांना दिलासालकडगंज झोनमधील देशपांडे ले-आऊट येथील हायटेन्शन लाईनचे घरांच्या बाजूने झुकलेले खांब उभे करण्यात आल्यामुळे आभा मेश्राम यांच्यासह पाच जणांची घरे कायदेशीर व धोकारहीत झाली आहेत. त्यामुळे त्यांची नावे कारवाईच्या यादीतून वगळण्यात आली आहेत. यासंदर्भात महावितरणने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. वीज खांब उभे करण्यासाठी आलेल्या खर्चात या घरमालकांनी ५९ हजार रुपयांचे योगदान दिले. त्यांनी कारवाईच्या नोटीसविरुद्ध उच्च न्यायालयात अर्ज सादर केला होता. उच्च न्यायालयाने महावितरणचे प्रतिज्ञापत्र लक्षात घेता तो अर्ज मंजूर केला. परिणामी, या घरमालकांना दिलासा मिळाला. घरमालकांच्यावतीने वरिष्ठ वकील सुबोध धर्माधिकारी व अ‍ॅड. लुबेश मेश्राम यांनी कामकाज पाहिले.