शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन फार्मसीच्या विरोधात ‘हल्लाबोल’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 23:13 IST

‘ऑनलाईन’ औषध विक्री विरोधात मंगळवारी देशभरातील केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट संघटनेने विरोध दर्शविला. नागपुरात डिस्ट्रिक्ट केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र कावडकर यांच्या नेतृत्वात ‘हल्लाबोल’ आंदोलन करीत अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील आणि अन्न व औषधी प्रशासनाचे सहायक आयुक्त प्रकाश शेंडे यांना निवेदन सादर केले.

ठळक मुद्देनागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे आंदोलन : जिल्हाधिकारी, ‘एफडीए’ला दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘ऑनलाईन’ औषध विक्री विरोधात मंगळवारी देशभरातील केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट संघटनेने विरोध दर्शविला. नागपुरात डिस्ट्रिक्ट केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र कावडकर यांच्या नेतृत्वात ‘हल्लाबोल’ आंदोलन करीत अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील आणि अन्न व औषधी प्रशासनाचे सहायक आयुक्त प्रकाश शेंडे यांना निवेदन सादर केले.संघटनेच्या मते, काही दिवसांपूर्वीच दिल्ली उच्च न्यायालयाने ‘ऑनलाईन’ औषध विक्रीबाबत ठोस नियम लागू होत नाहीत, तोपर्यंत त्यावर घालण्यात आलेली बंदी कायम राहील, असा आदेश दिला होता. पण, अद्याप या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही. यामुळे ‘हल्लाबोल’ आंदोलन करण्यात आले. ऑनलाईन औषधविक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सध्या कोणतेही नियम अस्तित्वात नाहीत. यामुळे आजघडीला देशात सुरू असलेली औषधांची ऑनलाईन विक्री अवैध आहे, असा दावाही केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने केला आहे. ‘ऑनलाईन फार्मसी’च्या माध्यमातून देशभरात बेकायदेशीरपणे व्यवसाय सुरू आहे. याद्वारे झोपेची औषधे, गर्भपाताच्या गोळ्या यासारख्या अनेक धोकादायक औषधांची विक्री सुरू असल्याचे प्रशासनाच्या वेळोवेळी निदर्शनास आले आहे. मात्र, प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. तसेच न्यायालयाच्या आदेशाचेदेखील पालन करण्यात येत नसल्याबाबत संघटनेने आश्चर्य व्यक्त केले आहे.‘लोकमत’शी बोलताना कावडकर म्हणाले, ऑनलाईन औषधी विक्रीच्या विरोधात २८ सप्टेंबर २०१८ रोजी एकदिवसीय बंद पाळण्यात आला. याच्या चार महिन्यातच हल्लाबोल आंदोलन केले. परंतु यावेळी रुग्णांना फटका बसू नये, यासाठी औषधालये सुरू ठेवण्यात आली. असोसिएशनच्या मागण्यांचे निवेदन जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी आणि अन्न व औषध प्रशासनाला (एफडीए) देण्यात आले. शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य औषधी परिषदेचे कार्यकारिणी सदस्य हरीश गणेशानी, जिल्हा सचिव हेतल ठक्कर, जिल्हा पदाधिकारी शैलेश गहलोद, वीरभान केवलरामानी, धनंजय जोशी, सतीश देऊळकर, राजू खंडेलवाल, अविनाश राव, श्रीकांत मुडे, प्रकाशचंद्र रणदिवे, अशोक ठाकरे, अनिल अप्पा, दत्ता खाडे, विशाल दत्ता, बाळू गोरले, शैलेश वैरागडे, राजू बाळसराफ, लतीफ बराडे, मनोज केडिया, अबरार खान, विशाल मानापुरे, शैलेश अग्रवाल, अशिफाक खान, निकुंज शाहू, अजय रुशिया, नीलेश त्रिवेदी, अभिजित हुद्दार, रिजवान शेख, जितेंद्र मोटघरे, मिहीर नायक, कमलेश भोयर, दीपक घोडमारे व केमिस्ट प्रतिनिधी सहभागी होते.

टॅग्स :medicinesऔषधंonlineऑनलाइन