शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

उद्या अर्ध्या शहराचा पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:13 IST

२४ तासांचे शटडाउन : गांधीबाग, मंगळवारी, धरमपेठ, धंतोली व सतरंजीपुरा या झोनचा समावेश लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ...

२४ तासांचे शटडाउन : गांधीबाग, मंगळवारी, धरमपेठ, धंतोली व सतरंजीपुरा या झोनचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अमृत योजनेंतर्गत अनोंदणीकृत व स्लम वस्त्यांमध्ये गोधनी-गोरेवाडा ४०० मिमी फीडर मेनवर आंतरजोडणीचे काम करण्यासाठी उद्या बुधवारी सकाळी १० ते गुरुवारी सकाळी १० दरम्यान जलवाहिन्या टाकण्यासाठी शटडाउन घेतले जाणार आहे. या दरम्यान, मनपा व ऑरेंज सिटी वॉटर यांनी इतरही काही महत्त्वाची कामे हाती घेण्याचे ठरविले आहे. यामुळे पेंच १ गोरेवाडा २४ तास बंद राहणार असल्याने गांधीबाग, मंगळवारी, धरमपेठ, धंतोली व सतरंजीपुरा या झोन्सचा पाणीपुरवठा बंद राहाणार आहे.

...

पाणीपुरवठा बाधित राहणारा भाग

गांधीबाग झोन (मेडिकल फीडर) : कोठी रोड, गाडीखाना, नवी शुक्रवारी, कर्नल बाग, रामाजी वाडी, सुभाष रोड, घाट रोड, जोहरीपुरा, चांडक ले आउट, इंदिरानगर, जाटतरोडी, रामबाग, इमामवाडा, रामबाग म्हाडा, मेडिकल, बारा सिग्नल, पटेल टिम्बर मार्केट, उंटखाना, राजाबाक्षा, घाट रोड

धंतोली झोन : वंजारीनगर, सोमवारी क्वाॅर्टर, वकीलपेठ, रघुजी नगर, हनुमाननगर, सिरसपेठ, रेशीमबाग, चंदन नगर, ओमनगर, शिव नगर, महावीर नगर, आनंद नगर, भागात कॉलनी, रघुजी नगर, सुदामपुरी, जुने नंदनवन, तिरंगा चौक, नेहरू नगर, कबीर नगर, गायत्री नगर, अजनी रेल्वे व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, कुकडे लेआउट, कौशल्या नगर, बाभूळखेडा, चंद्रमणी नगर, विलास नगर, वसंत नगर

धरमपेठ झोन : राजभवन बर्डी लाइन बर्डी मेनरोड, टेकडी रोड, कुंभारटोली, नेताजी मार्केट, तेलीपुरा, आनंद नगर, मोदी नं. १, २, ३ गणेश मंदिर, रामदासपेठ, महाराजबाग रोड.

मंगळवारी झोन : राजभवन छावणी लाइन; छावणी, राजनगर, मेकोसाबाग, बयरामजी टाऊन, ख्रिश्चन कॉलनी, विजयनगर, न्यू कॉलनी, पागलखाना, गड्डीगोदाम, माउंट रोड, बुटी चाळ, खेमका गल्ली, तुकाराम चाळ, रेड क्रॉस रोड, सदर व सदर पोलीस लाइन भाग, नई बस्ती, सिंधी कॉलनी, कडबी चौक, क्लार्क टाऊन, लुंबिनी नगर, गौतम नगर.

गोरेवाडा सीएसआर : नटराज सोसायटी, दर्शन सोसायटी, एकता नगर, नर्मदा सोसायटी, माधव नगर, प्रकाश नगर, उज्ज्वल नगर, गणपती नगर, शिव नगर, काळे लेआउट, जय दुर्गा नगर, केशव नगर, वेलकम सोसायटी, राष्ट्रसंत नगर, शबिना सोसायटी, श्रीकृष्ण नगर, आशीर्वाद नगर, सुमित नगर, गायत्री नगर, बाबा फरीद नगर, बंधू नगर, एमबी टाऊन १, २ व ३, माता नगर, झिंगाबाई टाकळी वस्ती, गीता नगर, डोये ले आउट, आदर्श नगर, मनवर ले आऊट, साईबाबा कॉलनी, फरस.

सतरंजीपुरा झोन : राजभवन बोरियापुरा फीडर मेन : लष्करीबाग, मोतीबाग रेल्वे क्वार्टर, मेयो हॉस्पिटल, सैफी नगर, अन्सार नगर, डोबी, कमल बाबा दर्गा, हंसापुरी, भगवाघर चौक, मोमिनपुरा, शेख बारी चौक, नाल साब चौक काला झेंडा तकिया, भानखेडा, दादरा पूल टिमकी, गोळीबार चौक, कोसारकर मोहल्ला, नंदबाजी डोहा, समता बुद्धविहार, सपाटे मोहल्ला, दांदरे मोहल्ला, देवघरपूर, गंगाखेत चौक, बाजीराव गल्ली, पाचपावली रेल्वे गेट, पिली मारबत, धापोडकर गल्ली (तांडापेठ), लाल दरवाजा, मुसलमानपुरा, बंगाली पंजा, मस्कासाथ, इतवारी तेलीपुरा, मिरची बाजार चौक, भाजीमंडी, लोहाओळी, रेशम ओळी, बर्तन ओळी, बाजीराव गल्ली, तीन नळ चौक, खापरीपुरा, भिशीकर मोहल्ला, भाजी मंडी, टांगा स्टँड, संभाजी कासार, ढीवरपुरा, राम नगर, बांगलादेश, उमाटेवाडी, बैरागीपुरा, तेलीपुरा पेवठा, बारईपुरा, मिरची मंदिर भाग, इतवारी रेल्वे स्टेशन, मारवाडी चौक आदींचा समावेश आहे.