शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात गारपीटग्रस्त शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 21:46 IST

गारपिटीने शेतातील संपूर्ण पीक उद्ध्वस्त केल्याने हताश झालेल्या कर्जबाजारी शेतकऱ्याने फवारणीचे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. हा शेतकरी अल्पभूधारक असून, त्यांच्याकडे २ लाख २५ हजार रुपयांचे बँक व नातेवाईकांचे कर्ज आहे. ही दुर्दैवी घटना काटोल तालुक्यातील इसापूर येथे शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देइसापूर येथील घटना : दोन लाख रुपयांचे होते कर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गारपिटीने शेतातील संपूर्ण पीक उद्ध्वस्त केल्याने हताश झालेल्या कर्जबाजारी शेतकऱ्याने फवारणीचे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. हा शेतकरी अल्पभूधारक असून, त्यांच्याकडे २ लाख २५ हजार रुपयांचे बँक व नातेवाईकांचे कर्ज आहे. ही दुर्दैवी घटना काटोल तालुक्यातील इसापूर येथे शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.प्रल्हाद मधुकर धोटे (४७, रा. इसापूर खुर्द, ता. काटोल) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. धोटे यांच्याकडे वडिलोपार्जित पाच एकर शेती असून, दोघे भाऊ असल्याने त्यांच्या वाट्याला अडीच एकर शेती आली होती. त्यांनी काही वर्षांपूर्वी बँक आॅफ इंडियाच्या झिलपा (ता. काटोल) शाखेकडून पीककर्ज घेतले होते. हे कर्ज थकीत राहिल्याने कर्जाची व्याजासह रक्कम १ लाख ७५ हजार रुपयांवर पोहोचली होती. बँकेकडून कर्ज मिळत नसल्याने शेतीच्या मशागतीसाठी त्यांनी सावकार व नातेवाईकांकडून ७० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते.यावर्षी त्यांनी कपाशी, गहू व हरभऱ्याची पेरणी केली होती. बोंडअळी कपाशी आणि चार दिवसांपूर्वी झालेल्या गारपिटीमुळे गहू व हरभऱ्याचे प्रचंड नुकसान झाले. शेती व घरखर्च कसा भागवायचा, याच विवंनेत ते राहायचे. त्यांनी दिवसभर शेतीची कामे केली आणि सायंकाळी घरी कुणीही नसताना कीटकनाशक प्राशन केले. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना लगेच काटोल येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. तिथे डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. त्यांना एक विवाहित व तीन अविवाहित मुली आहेत. या प्रकरणी काटोल पोलिसांनी नोंद करून तपास सुरू केला आहे.ठिय्या आंदोलनाचा चौथा दिवसकाटोल व नरखेड तालुक्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. गारपीटग्रस्त गावांमध्ये प्रल्हाद धोटे यांच्या इसापूर (खुर्द) गावाचाही समावेश आहे. या दोन्ही तालुक्यातील बोंडअळी व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने योग्य नुकसानभरपाई तातडीने द्यावी, या मागणीसाठी आ. डॉ. आशिष देशमुख यांनी काटोल येथे बुधपारपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. शनिवारी या आंदोलनाचा चौथा दिवस होता. मात्र, शासनाने अद्यापही आंदोलनाची दखल घेतली नाही. आ. देशमुख यांनी लगेच ग्रामीण रुग्णालयात जाऊन प्रल्हाद धोटे यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांना दिलासा दिला.

टॅग्स :FarmerशेतकरीSuicideआत्महत्या