शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
3
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
4
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
5
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
6
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
7
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
8
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
9
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
10
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
11
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
12
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
13
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
14
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
15
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
16
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
17
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
18
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
19
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत

पोलीस सतर्क असते तर टळली असती नागपुरातील हरिदासची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 23:54 IST

सक्करदरा पोलिसांनी आरोपी पितापुत्रावर कडक कारवाई करून पाळत ठेवली असती तर गरीब बॅग विक्रेता हरिदास सावरकर याला जीव गमवावा लागला नसता. बंटी आणि त्याचे वडील तीन दिवसापासून त्याच्या हत्येची योजना मूर्त रूपात आणण्याच्या तयारीत होते. ही माहिती मिळूनही पोलीस सतर्क झाले नाही.

ठळक मुद्देआईवडिलांसह कुख्यात बंटीला अटक : नागरिक प्रचंड संतप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सक्करदरा पोलिसांनी आरोपी पितापुत्रावर कडक कारवाई करून पाळत ठेवली असती तर गरीब बॅग विक्रेता हरिदास सावरकर याला जीव गमवावा लागला नसता. बंटी आणि त्याचे वडील तीन दिवसापासून त्याच्या हत्येची योजना मूर्त रूपात आणण्याच्या तयारीत होते. ही माहिती मिळूनही पोलीस सतर्क झाले नाही. पोलिसांच्या या ढिलेपणामुळे सक्करदरा परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. या घटनेचे पडसाद कधीही उमटू शकतात. दरम्यान पोलिसांनी आरोपी गुंड शेरखान शेख ऊर्फ बंटी याला आईवडिलासह अटक केली आहे.४५ वर्षीय हरिदासची मंगळवारी सायंकाळी ४ वाजता भांडे प्लॉट चौकात बंटी आणि त्याच्या वडिलाने हत्या केली होती. या दोघांचीही हरिदास आणि डॉ. नितीन गुडंकवार यांच्यासह अन्य चार जणांसोबत वाद होता. एनआयटीने बंटीचे अवैध दुकान तोडले होते. त्याने बिल्डरकडून दुकान खरेदी केले होते. मात्र तो बिल्डरला सोडून हरिदास आणि अन्य तिघांकडून पैसे मागत होता. मागील काही दिवसांपासूनच डॉ. गुडंकवार आणि हरिदास यांना अद्दल घडविण्याच्या तयारीत तो होता. तो याच परिसरात आपल्या आईवडिलांसोबत राहतो. हरिदासला एकटे असल्याचे पाहून बंटी आणि त्याच्या वडिलांनी हल्ला केला. त्याची आई आबेदा ही सुद्धा या दोघांनाही त्याची हत्या करण्यासाठी प्रोत्साहित करीत होती. हरिदासची पत्नी रंजना पतीला वाचविण्यासाठी मध्ये पडली असता बंटीने तिलाही शिव्या देऊन धमकावले. या हत्येमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. हरिदासचे नातेवाईक आणि नागरिकांनी सक्करदरा पोलिसांवर रोष व्यक्त केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ढिलाईमुळेच ही घटना घडल्याची तक्रार करण्यात आली आहे. सक्करदरा पोलिसांनी तपास करून तिघांनाही बुधवारी सकाळी ताब्यात घेतले.बंटी आणि त्याच्या वडिलाची भांडे प्लॉट चौकात दहशत आहे. तो नेहमी कारमध्ये शस्त्र बाळगतो. त्याने जुलै २०१९ मध्ये भांडे प्लॉट चौकातील एक जनरल स्टोअर्स उद्ध्वस्त केले होते. १८ मार्चला डॉ. गुडंकवार यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. मात्र या प्रकरणात पोलिसांनी फक्त बंटीलाच आरोपी बनविले. तो १५ दिवसातच जमानतीवर बाहेर आला. बाहेर आल्यापासूनच तो हरिदासच्या हत्येच्या तयारीत होता. हरिदास, डॉ. गुडंकवार, रोहित वर्मा आणि संदीप महंत यांच्या तो सतत पाळतीवर असायचा. या चौघांवर त्याने बरेचदा हल्ला केला होता. सक्करदरा पोलिसात आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या संदर्भात वारंवार तक्रारी करण्यात आल्या होता. मात्र कारवाई होत नव्हती. १८ मार्चला डॉ. गुडंकवारवर प्राणघातक हल्ला केल्यानंतरही पोलिसांनी बंटीला पैसे देऊन प्रकरण मिटविण्याचा सल्ला दिला होता. अलिकडेच दोन दिवसापासून डॉ. गुडंकवार क्लिनिक उघडायला लागले होते. हरिदास त्यांना भेटायला यायचा. या दोघांवरही बंटीचा डोळा होता. गुडंकवार यांनी क्लिनिकजवळ बंटीला पाहिले होते. सुरक्षेसाठी ते क्लिनिकबाहेर निघणे टाळायचे. मात्र दुर्दैवाने हरिदास गुंडांच्या हातात लागला.कारमध्ये असायचे सशस्त्र गुंडबंटी नेहमी कारमध्ये शस्त्र घेऊन गुंडांसोबत फिरायचा. कारच्या काचांना काळी फिल्म लावली असल्याने आत कोण आहे ते कळत नसे. परिसरातील नागरिकांनी या संदर्भात सक्करदरा पोलिसांना आणि वरिष्ठांना अनेकदा बंटीच्या कारबद्दल माहिती दिली होती. मात्र पोलिसांनी एकदाही त्याला पकडण्याचा प्रयत्न केला नाही.नुकसान भरपाईची मागणीहरिदासच्या हत्येमुळे त्याच्या कुटुंबापुढे मोठेच संकट आले आहे. जगण्याचाही प्रश्न आहे. हरिदासने हत्येच्या काही वेळापूर्वीच डॉ. गुडंकवार यांच्याशी चर्चा केली होती. व्यवसाय ठप्प पडल्याने मोठे आर्थिक संकट आल्याचे सांगितले होते. नागरिकांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटून घटनेची उच्चस्तरीय चौकशीची आणि हरिदासच्या कुटुंबाला नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. झोन चारच्या डीसीपी निर्मला देवी यांनी हरिदासच्या पत्नीची भेट घेऊन आरोपींना शिक्षेपर्यंत पोहचविण्याची आणि सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून