शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

हौसेला लागतोय जिद्दीचा कस ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उपजत गुणवत्तेलाही पैलू पाडावे लागतात. मात्र, पैलू पाडताना प्रतिभावंतातही जिद्द, समर्पण आणि चिकाटी लागते. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : उपजत गुणवत्तेलाही पैलू पाडावे लागतात. मात्र, पैलू पाडताना प्रतिभावंतातही जिद्द, समर्पण आणि चिकाटी लागते. हे सगळे गुण आपल्या आजूबाजूलाच दिसून येतात. सूक्ष्म जाणिवेने ते बघावे लागतात. अशाच काही प्रेरणा तुमच्यापुढे घेऊन येत आहोत. या प्रेरणांकडे बघून ‘अरेच्चा, हीच का ती’ असा आश्चर्याचा धक्का बसू शकतो किंवा ‘यात काय नवल’ असेही अनेकांना वाटू शकते. ‘जैसी जिसकी दृष्टी, वैसा उसका भाव’ अशीच ही स्थिती आहे. प्रतिभावंतांना पैलू पाडताना त्यांच्या पालकांकडूनही संयम अपेक्षित असतो आणि मुलांना त्यांचे स्वातंत्र्य द्यावे लागते. तुमच्यापुढे येत असलेले हे प्रेरणारूपी चिमुकले घडण्यात, त्यांच्या पालकांचेही तेवढेच मोल आहे, हे विशेष.

समर्पण - ध्येय गाठण्यासाठी नयनचे परिश्रम ()

नयन कोहळे ही सर्वसामान्य घरची १६ वर्षीय मुलगी. उपजत नृत्यकौशल्यामुळे तिने लहानपणापासूनच विविध स्पर्धांमध्ये बक्षिसे पटकावली. बक्षिसांमुळे उपशास्त्रीय व शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. पाचव्या वर्गात असताना उत्तम गुरुच्या शोधात तिला नृत्यगुरू अवंती हर्षे-काटे लाभल्या. गुरुंकडे कथ्थक नृत्याचे धडे गिरवणे सुरू झाले. नृत्यसाधनेत ती इतकी मग्न झाली की हेच माझे भविष्य हा निर्धार केला. दहावीत असताना एक अडचण आली. गुरुंना वैयक्तिक कारणाने जायबंद व्हावे लागले. मात्र, स्वत:सह इतर सहविद्यार्थिनींची जबाबदारी तिने पेलली. त्यासाठी तिने उन्हाळ्यात क्रॅश कोर्स पूर्ण केला. नंतर शाळेतील अभ्यास आणि क्लासेसमधील इतर विद्यार्थिनींना प्रशिक्षण देण्याचे कर्तव्य तिने पार पाडले. हे करत असतानाच मध्यमा पूर्णची परीक्षाही देणे होतेच. या सर्वात तिने उत्तम कामगिरी केली. सोमलवारची विद्यार्थिनी असलेल्या नयनने दहावीच्या परीक्षेत ९५ टक्के प्राप्त केले. मध्यमा पूर्णमध्ये ती नागपूर विभागातून विशेष प्राविण्यासह प्रथम आली आणि इतर विद्यार्थ्यांनाही सर्वोत्तम ठरवले. गुरुवरील समर्पणाचा, स्वत:च्या ध्येयावरील निष्ठेचा हा धडा इतर मुलामुलींसाठी एक प्रेरणा आहे.

श्रवण संस्कार - साडेचार वर्षीय अनन्याचे स्तोत्रपाठ ()

लहानपणीचे संस्कार हे प्रबळ असतात आणि त्याची प्रचिती केवळ साडेचार वर्षाची असलेल्या अनन्या जोशी हिच्याकडे बघितल्यावर येते. वडील पराग जोशी कालिदास संस्कृत विश्वविद्यालयात संस्कृतचे प्राध्यापक आहेत. रोज सकाळी पूजापाठ हा घरचा रोजचाच नित्यनेम. वडिलांसोबत पूजेला बसताना कधी श्रवणसंस्कार घडले हे कळलेच नाही. तिला सर्वसामान्यांना उच्चारणेही कठीण व्हावे, असे श्लोक, स्तोत्र मुखपाठ आहेत. ती केजी वनची विद्यार्थिनी आहे. श्रवणसंस्कारामुळे केवळ थोड्या परिश्रमाने तिला मोठमोठे स्तोत्र पाठ झाले. एवढेच नव्हे तर ती आत एकट्यानेच नवरात्र, गणपती उत्सव व अन्य उत्सवात स्तोत्र पाठ करते. पुरुषी पगडा असलेल्या पौरोहित्याच्या क्षेत्रात कदाचित ती पौरोहित्य करणारी एक स्त्री म्हणून पुढे येईल. तिला देवी अपराधक क्षमापना स्तोत्र, भवानी अध्याय, महिषासुरमर्दिनी स्तोत्र, रेणुका स्तोत्र, शारदा स्तुती, संस्कृत मंत्र आदी मुखपाठ आहेत. यंदाच्या नवरात्रात नऊ दिवस व गणेशोत्सवात ११ दिवस तिने हे सगळे पाठ नित्यनेमाने केले. आपले संस्कार आणि संस्कृतीची जाणीव तिला लहानपणापासूनच होत आहे, याचा आनद पराग जोशी यांनी व्यक्त केला.

आत्ममंथन - अवघ्या अडीच वर्षापासूनच ईशिताची रंगसंगती ()

आत्ममंथनातून चित्रकारिता अवगत होते, असे म्हटले जाते. रंग हातात पडले की प्रत्येकच मुले रंगांची मुक्तहस्ते उधळण करतात आणि त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार आपल्या गोड कल्पना कुठेही साकारत असतात. ईशिता लिंबेकर हिचेही तसेच. ईशिताचे वडील मिलिंद मोठे चित्रकार आहेत. दोन-अडीच वर्षाची असताना मिलिंद यांनी कॅनव्हॉसवर एक चित्र रेखाटले आणि फोनवर बोलताना बाहेर पडले. तेव्हा ईशिता तिथेच आपली रंगचमत्कार साकारत होती. वडिलांनी चित्राला एकटेच सोडले म्हणून ईशिताने त्यांच्या अर्धवट कलाकृतीवर आपल्या कल्पना साकारण्यास सुरुवात केली. मिलिंद फोनवरचे बोलणे झाल्यावर परत आले तर बघतात काय.. अर्धवट चित्रांवर रंग स्प्रेड केले होते आणि ते अधिकच उठून दिसले. रागावण्याचे सोडून तिच्या त्या कृतीला प्रोत्साहन देण्यास सुरुवात झाली आणि वयाच्या पाचव्या वाढदिवशी तिच्या चित्रांचे प्रदर्शन भरविले. पहिल्याच प्रदर्शनात १५० चित्रे सादर झाली. पुढे मुंबईच्या नेहरू सेंटर व दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय कला मेळ्यात तिचे चित्र लागले. नेहरू सेंटरमध्ये जेव्हा प्रदर्शन भरविले तेव्हा ती केवळ साडेसहा वर्षाची होती. तिला आंतरराष्ट्रीय पातळीवरील विख्यात चित्रकारांचे कौतुक लाभले आहे. विशेष म्हणजे इंटरनॅशनल मॅगझिनने तिचा खास इंटरव्ह्यूही घेतला. आता ती सातव्या वर्गात शिकते.