रामटेक : वैष्णवी योगा ग्रुपच्या वतीने रामटेक शहरातील नगरपरिषद विद्यालयात रविवारी (दि.२५) गुरुपूजेचा कार्यक्रम आयाेजित केला हाेता. यावेळी नागरिकांना याेगाचे महत्त्व पटवून देण्यात आले, शिवाय भजनही सादर करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मधुकर पराते, मेंघर, रेखा पराते, नगरसेवक सुमित कोठारी, नगरसेविका सुरेखा माकडे, डॉ.बापू सेलोकर, वसंता डामरे उपस्थित हाेते. श्री जनार्दन स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. मधुकर पराते यांनी नागरिकांना याेगाचे महत्त्व पटवून देत, निराेगी राहण्यासाठी नियमित याेगा करण्याचे आवाहन केले. यावेळी अतिथींच्या हस्ते याेगा शिक्षकांचा गाैरव करण्यात आला. मेंघर व त्यांच्या सहकाऱ्यांनी भजनाचा कार्यक्रमही सादर केला. यशस्वितेसाठी रमेश चौकसे, सुरेश टिपले, गजानन गुंडुकवार, राहुल श्यामकुवर, नत्थू घरजाले, दिलीप कुर्वे, नरेंद्र चव्हाण, लक्ष्मीकांत कोल्हे, काजल घरजाले, मंगला चोपकर, मंदा मते यांनी सहकार्य केले.