शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गुमगावजवळ रेल्वे रुळाला तडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 01:39 IST

नागपूरवरून केरळ एक्स्प्रेस जात असताना अचानक गुमगाव रेल्वेस्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याची बाब केरळ एक्स्प्रेसच्या लोकोपायलटच्या लक्षात आली.

ठळक मुद्देअनर्थ टळला : रेल्वे प्रशासन आणखी किती घेणार ‘रिस्क’

दयानंद पाईकराव ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरवरून केरळ एक्स्प्रेस जात असताना अचानक गुमगाव रेल्वेस्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याची बाब केरळ एक्स्प्रेसच्या लोकोपायलटच्या लक्षात आली. समयसूचकता दाखवून ही गंभीर बाब त्याने रेल्वे प्रशासनाला कळविल्यामुळे लगेच डागडुजी करण्यात आली.अन्यथा त्यानंतर काही मिनिटातच या मार्गावरून जाणाºया नंदीग्राम एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरण्याची दाट शक्यता होती. या घटनेवरून थर्ड लाईन किती गरजेची आहे, ही बाब प्रकर्षाने जाणवत असून रेल्वे प्रशासन आणखी किती ‘रिस्क’ घेऊन नागपूर-वर्धा मार्गावर रेल्वेगाड्या चालविणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.नागपूर-वर्धा थर्ड लाईनची अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. मागील पाच वर्षांपूर्वी या रेल्वे लाईनची मागणीही अर्थसंकल्पात मंजूर झाली. सध्या १०० रेल्वेगाड्या चालविण्याची क्षमता आहे. मात्र,या मार्गावरून १५० रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. गुरुवारी सकाळी नागपूर-वर्धा रेल्वे रुळ गुमगाव रेल्वेस्थानकाजवळ उखडलेला आढळल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. अन्यथा शेकडो प्रवाशांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला असता. थर्ड लाईनला मंजुरी मिळून जवळपास पाच वर्षे पूर्ण होऊनही ती पूर्ण न झाली नाही. थर्ड लाईन मंजूर होऊन तिचे काम अद्यापपर्यंत पूर्ण व्हावयास हवे होते.परंतु रेल्वे प्रशासनाच्या कासवगतीमुळे अद्यापही हे काम पूर्णत्वास येऊ शकले नाही. गुरुवारी सकाळी ६ वाजता केरळ एक्स्प्रेसच्या लोकोपायलटला रेल्वे रुळाला तडा गेल्याची बाब जाणवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या लोकोपायलटने केरळ एक्स्प्रेस कशीबशी पुढे नेली. परंतु त्याने त्वरित या बाबीची माहिती आॅपरेटींग विभागाला दिली. सकाळी ६.३० वाजता अभियांत्रिकी विभागाचे वरिष्ठ तसेच कनिष्ठ अभियंता आणि कर्मचारी तेथे पोहोचले. त्यांनी रेल्वे रुळाच्या डागडुजीचे काम हाती घेतले. तब्बल दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी तयार करण्यात आला. परंतु केरळ एक्स्प्रेसच्या लोकोपायलटचे याकडे दुर्लक्ष झाले असते तर नंदीग्राम एक्स्प्रेस रुळावरून घसरून मोठी दुर्घटना टळली असते हे विशेष. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गंभीर बाब असलेल्या नागपूर-वर्धा थर्डलाईनच्या कामाला गती देण्याची गरज निर्माण झाली आहे.गाड्या वेळेवर चालविण्याचा प्रयत्न‘विभागात सर्व गाड्या वेळेवर चालविण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न असतो. एखादी घटना घडल्यास तेथे त्वरित काम करून तो मार्ग वाहतुकीसाठी खुला करून देण्यात येतो. त्यामुळे नंदीग्राम एक्स्प्रेस जाताना फ्रॅक्चर आढळल्यामुळे लगेच काम हाती घेऊन डागडुजी करण्यात आली.’प्रवीण पाटील, जनसंपर्क अधिकारी,रेल्वे प्रशासनाने खबरदारी घेण्याची गरज‘एखादा रेल्वेमार्ग खूप व्यस्त असल्यास त्या मार्गावरून किती रेल्वेगाड्या चालवायच्या हा रेल्वे बोर्डाचा आणि प्रशासनाचा विषय आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेशी तडजोड न करता रेल्वे प्रशासनाने हा विषय हाताळण्याची गरज आहे.’-विनोद चतुर्वेदी, विभागीय अध्यक्ष सेंट्रल रेल्वे मजदूर संघ, नागपूर विभाग