शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

गुजरातच्या निकालाची नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर छाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 10:26 IST

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या व अंतिम आठवड्याचे कामकाज सोमवारपासून सुरू होत असून त्यावर गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालाची छाया असेल.

ठळक मुद्देविधिमंडळ अधिवेशनआजपासून शेवटचा आठवडा

आॅनलाईन लोकमतनागपूर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या व अंतिम आठवड्याचे कामकाज सोमवारपासून सुरू होत असून त्यावर गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालाची छाया असेल. सरकारला खिंडीत पकडण्याची संधी पहिल्या आठवड्यात गमावलेले विरोधक दुसऱ्या आठवड्यात सत्तापक्षाला कसे घेरतात याबाबत उत्सुकता असेल. एक्झिट पोलचा कौल खरा ठरून भाजपाला सत्ता मिळाली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे मनोबल वाढलेले असेल. त्या मनोबलाच्या आधारे सत्तापक्ष अधिवेशनाचे पाच दिवसांचे कामकाज सहजगत्या पार पाडेल. मात्र, गुजरातमध्ये काँग्रेसला सत्ता मिळाली तर मात्र नीतीधैर्य वाढलेली काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी विधिमंडळात अधिक आक्रमक राहील. सत्तापक्षाच्या आरोपांना आक्रमक उत्तरे देण्याची रणनीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आखली आहे. गुजरातचा निकाल काहीही आला तरीही ती तशीच राहील, असे सूत्रांनी सांगितले. मोर्चाच्या निमित्ताने काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये दिसून आलेला समन्वय अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात जाणवला नाही.राज्यातील कायदा व सुव्यवस्था स्थितीवरून विरोधक गृहखाते सांभाळत असलेले मुख्यमंत्री फडणवीस यांना घेरण्याची शक्यता आहे. शिक्षण, सामाजिक न्याय, ग्रामविकास, नगरविकास, गृहनिर्माण या विभागांना लक्ष्य केले जाऊ शकते. विधिमंडळाचे अधिवेशन चार आठवडे चालविण्याची मागणी विरोधकांनी सुरुवातीला केली होती. तथापि, अधिवेशनाचे सूप २२ डिसेंबरलाच वाजेल, हे निश्चित आहे. त्या दृष्टीने मंत्री, आमदार, सचिवांची परतीची तिकिटेही निघाली आहेत.अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात बोंडअळीमुळे झालेले नुकसान, कर्जमाफी हे विषय लावून धरले तरी शासनाने कुठलाही निर्णय घेतला नाही. आता दुसऱ्या आवठवड्यात या मुद्यांसह कायदा व सुव्यवस्था, विदर्भाचे प्रश्न तसेच घोटाळे लावून धरू.- धनंजय मुंडेविरोधी पक्षनेता, विधान परिषद

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७