शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

नागपूर जिल्ह्यातील ३०१ गावांमध्ये पीकनिहाय शेतकऱ्यांना मार्गदर्शन : अश्विन मुदगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 10:59 PM

सरासरीच्या तुलनेत केवळ ४० दिवसांत ९४ टक्के पाऊस पडूनही भाताच्या उत्पादकतेमध्ये वाढ झाली आहे. कापूस, सोयाबीन या पिकांच्या क्षेत्रात खरीप हंगामात वाढ करण्यात आली असून शेतकऱ्यांना उत्पादन वाढीच्या दृष्टीने जिल्ह्यात प्रथमच शेतकरी शेतीशाळेच्या माध्यमातून ३०१ गावांत पीकनिहाय शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.

ठळक मुद्देजिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावाखरीप कृषी उत्पादन कार्यक्रमाचे नियोजनसोयाबीन क्षेत्रात वाढ, २० टक्के बीबीएफ लागवडपाण्याच्या उपलब्धतेनुसार पीक पद्धतीत बदल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरासरीच्या तुलनेत केवळ ४० दिवसांत ९४ टक्के पाऊस पडूनही भाताच्या उत्पादकतेमध्ये वाढ झाली आहे. कापूस, सोयाबीन या पिकांच्या क्षेत्रात खरीप हंगामात वाढ करण्यात आली असून शेतकऱ्यांना उत्पादन वाढीच्या दृष्टीने जिल्ह्यात प्रथमच शेतकरी शेतीशाळेच्या माध्यमातून ३०१ गावांत पीकनिहाय शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.बचत भवन सभागृहात जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व पीकनिहाय आढावा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी घेतला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. पंचभाई, अधीक्षक कृषी अधिकारी प्रज्ञा गोडघाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, कृषी उपसंचालक डी. एस. कसरे आदी उपस्थित होते.जिल्ह्यात सर्वसाधारण खरीप हंगामाध्ये ४ लक्ष ७९ हजार २१० हेक्टर क्षेत्र असून सोयाबीन, कापूस, तूर, भात या पिकासह इतर पिके जिल्ह्यात घेतली जातात. मागील वर्षीच्या तुलनेत कापसाखाली २२ हजार ५०० हेक्टर, सोयाबीन १० हजार हेक्टर, भाताखाली ९४ हजार २०० हेक्टर, तुरीखाली ६ हजार ५०० हेक्टर आदी पिकांचे नियोजन करण्यात आले आहे. या नियोजनानुसार उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने कमी पाण्यात येणाऱ्या पिकांना प्राधान्य देण्यात येत असून पीक पद्धतीबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सांगितले.शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीककर्ज पुरवठा वेळेवर उपलब्ध व्हावा, यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना करताना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल म्हणाले की, जिल्ह्याला खरीप हंगामात ९ हजार २०० कोटी रुपयांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार कर्ज वाटपाला सुरुवात झाली असून आतापर्यंत २० कोटी रुपयांचे कर्ज विविध बँकांमार्फत वितरित करण्यात आले आहे. राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांना सहज व सुलभपणे कर्ज पुरवठा करावा, असे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.खरीप हंगाम सुरु होण्यापूर्वी शेतकऱ्यांना बी-बियाणे व खतांचा पुरवठा सुलभपणे होईल यादृष्टीने नियोजन करताना निकृष्ट प्रतीचे बियाणे कृषी केंद्रांमार्फत विकल्या जाणार नाहीत. याची खबरदारी घेण्यासाठी भरारी पथके तयार करावीत व या पथकांच्या माध्यमातून या केंद्रांची तपासणी करावी, अशी सूचनाही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केली. जिल्ह्यात ५ हजार ६३ क्विंटल कापूस, ३ हजार १२० क्विंटल तूर, ६३ हजार ४५० क्विंटल सोयाबीन व २१ हजार १५० क्विंटल भात या बियाण्यांची मागणी असून त्याप्रमाणे महाबीज व खासगी बियाणे उत्पादक कंपन्यांकडून उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी दिली.पेंच प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीक बदल करुन कमी कालावधीच्या धानाचे वाण लागवड करण्याबाबत २१३ गावात शेतकऱ्यांना नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.सोयाबीन पिकामध्ये २० टक्के क्षेत्रात बीबीएफ पद्धतीने लागवड तसेच भात पिकाच्या १० टक्के पिकावर पट्टा पद्धतीने लागवड करण्यात येणार आहे. कापूस पिकामध्ये ५० टक्के क्षेत्रावर सरी वरंभा पद्धतीने लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सामूहिक शेततळे, संरक्षित शेती, पाली हाऊस, शेडनेट गृह, प्लास्टिक मल्चिंग, यांत्रिकीकरण, पॅक हाऊस आदी एकात्मिक फलोत्पादन विभाग कार्यक्रमासाठी ७ हजार ४६५ अर्ज शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. तसेच कृषी सहायकांच्या क्षेत्रावर प्रत्येकी १० हेक्टरप्रमाणे कडबा लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.१ लाख हेक्टर क्षेत्रावर सिंचनजिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु अशा १०७ प्रकल्पांमधून मागील वर्षी १ लाख ८ हजार ५५० हेक्टर क्षेत्रावर सिंचनाच्या सुविधा उपलब्ध झाल्या होत्या. परंतु यावर्षी पेंच प्रकल्पात पुरेसा जलसाठा उपलब्ध नसल्यामुळे ८६ हजार ४०५ हेक्टर क्षेत्रावर सिंचनाचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच १२ हजार विहिरींच्या माध्यमातून पूरक सिंचनाचा लाभ अपेक्षित आहे.१०० टक्के शेतकऱ्यांना मृद आरोग्य पत्रिकाशेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी जमीन आरोग्य पत्रिका तयार करण्यात येत असून त्यानुसार जिल्ह्यातील १ लाख १६ हजार ४४८ जमीन मृद पत्रिका शेतकऱ्यांना वितरित करण्यात आल्या आहेत. यामध्ये ७१३ गावातील ३८ हजार ८४६ मृद नमुने तपासण्यात आली आहेत. यावर्षी १ हजार १८६ गावांतील ३९ हजार मृद पत्रिकांच्या वितरणाचे लक्ष्य ठरविण्यात आले आहे.

 

टॅग्स :FarmerशेतकरीNagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालय