शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

नागपूरच्या विकासासाठी कार्लस्रू शहराचे मार्गदर्शन महत्त्वाचे :नंदा जिचकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 22:12 IST

भारतात ‘स्मार्ट सिटी’योजनेअंतर्गत निवडण्यात आलेल्या शहरात नागपूरचा समावेश आहे. शहरातील प्रकल्प प्रगतिपथावर आहेत. अपारंपरिक ऊर्जा स्रोताचा वापर ऊर्जानिर्मिती आणि परिवहनासाठी मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. या कार्यात जर्मनीतील कार्लस्रू शहराचा आदर्श नागपूरने समोर ठेवला आहे. पुढील प्रकल्पांसाठी आणि चांगल्या संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी कार्लस्रू शहरातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन नागपूरसाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी मंगळवारी केले.

ठळक मुद्देजर्मन शिष्टमंडळ दोन दिवसीय कार्यशाळेत सहभागी होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतात ‘स्मार्ट सिटी’योजनेअंतर्गत निवडण्यात आलेल्या शहरात नागपूरचा समावेश आहे. शहरातील प्रकल्प प्रगतिपथावर आहेत. अपारंपरिक ऊर्जा स्रोताचा वापर ऊर्जानिर्मिती आणि परिवहनासाठी मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. या कार्यात जर्मनीतील कार्लस्रू शहराचा आदर्श नागपूरने समोर ठेवला आहे. पुढील प्रकल्पांसाठी आणि चांगल्या संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी कार्लस्रू शहरातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन नागपूरसाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी मंगळवारी केले.स्मार्ट सिटीअंतर्गत असलेल्या ‘सिटी टू सिटी पेअरिंग’ कार्यक्रमांतर्गत नागपूर आणि जर्मनीतील कार्लस्रू शहरांमध्ये झालेल्या करारानुसार कार्लस्रू येथील शिष्टमंडळ नागपुरात दाखल झाले आहे. महापालिका मुख्यालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात महापौरांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले. नागपूर स्मार्ट अ‍ॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन लिमिटेडतर्फे आयोजित मोबीलाईज युअर सिटी या कार्यशाळेत ते सहभागी होणार आहे.उपमहापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, राम जोशी, एनएसएससीडीसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे, संचालक मंगला गवरे, मुख्य महाव्यवस्थापक राजेश दुफारे, विजय बनगीरवार, देवेंद्र महाजन, मेट्रोचे सुहासकुमार सिन्हा, सहमहाव्यवस्थापक महेश गुप्ता, महाव्यवस्थापक उदय घिये उपस्थित होते. शिष्टमंडळात कार्लस्रूच्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचे इनोव्हेशन हेड राफ ईकॉर्न , कार्लस्रू डिजीटलचे स्टीफन बुल्ह , कार्लस्रू अर्बन प्लानिंग डिपार्टमेंटच्या प्रा. डॉ. इंग अँक कारमन-वोएस्नर, युनिव्हर्सिटी आॅफ अप्लाईड सायंसेस इन्स्टिट्यूट आॅफ ट्राफिक अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रा. डॉ. इंग जान रील , स्ट्रेटॅजी आर्किटेक्ट आॅलिवर विल , कार्लस्रूच्या पुणे इनोव्हेशन कार्यालय प्रमुख श्रीमती इरिस बेकर , इंटरनॅशनल अर्बन को-आॅपरेशनचे आशिष पंडित, आशिष वर्मा, यांचा सहभाग आहे.रामनाथ सोनवणे यांनी नागपूर आणि कार्लस्रू शहरामध्ये सिटी टू सिटी पेअरिंग अंतर्गत झालेल्या करारासंदर्भात माहिती दिली. महापौरांनी आपल्या भाषणात जर्मनीतील बॉर्न शहराचा उल्लेख करीत तेथील वाहतूक व्यवस्थेने आपण प्रभावित झाल्याचे सांगत तशी वाहतूक व्यवस्था नागपुरात व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.बुधवारी विविध प्रकल्पांचे सादरीकरणनागपूर स्मार्ट अ‍ॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन लिमिटेडतर्फे बुधवारी प्रशासकीय इमारतीतील सभागृहात कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. सकाळी १० वाजता रामनाथ सोनवणे स्मार्ट सिटीवर सादरीकरण करतील. सकाळी ११ वाजता मनपाच्या वाहतूक विभागाचे व्यवस्थापक शिवाजी जगताप नागपूर शहर बससेवेचे (आपली बस) सादरीकरण करतील. यानंतर वाहतूक अभियंता आसाराम बोदिले नागपूर शहराच्या व्यापक वाहतूक नियोजनावर सादरीकरण करतील. दुपारी १२ वाजता महामेट्रोच्या वतीने सादरीकरण होईल. २९ नोव्हेंबर रोजी सुद्धा विविध प्रकल्पांचे सादरीकरण होईल. दोन दिवसांच्या मुक्कामादरम्यान कार्लस्रूचे शिष्टमंडळ मिहानसह नागपुरातील विविध प्रकल्पांना भेटी देतील. कार्यशाळेचा समारोप शुक्रवारी सकाळी १० वाजता होईल.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाGermanyजर्मनी