शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बंद यंत्रांची पालकमंत्र्यांकडून दखल

By admin | Updated: September 8, 2015 05:27 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) कोट्यवधीची महत्त्वाची यंत्रे उपलब्ध असताना ते

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) कोट्यवधीची महत्त्वाची यंत्रे उपलब्ध असताना ते हाताळणारे तंत्रज्ञच नसल्याने ती धूळखात पडली आहेत. परिणामी गोरगरीब रुग्णांना पदरमोड करून ऐनवेळी खासगी केंद्रामध्ये धाव घ्यावी लागत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने ५ सप्टेंबरच्या अंकात ‘तंत्रज्ञाअभावी महागडी उपकरणे धूळखात’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केले होते. याची दखल पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली असून तत्काळ कारवाईचे निर्देश दिले आहेत.मेडिकलमध्ये रुग्णांच्या आजाराचे तत्काळ निदान व्हावे, चांगले उपचार मिळावे म्हणून शासन दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उपकरणे उपलब्ध करून देते. विशेष म्हणजे, रुग्णालय प्रशासन व शासनही यंत्र खरेदीसाठी बरीच उत्सुकता दाखविते, परंतु ते हाताळण्यासाठी तंत्रज्ञच देत नाही. त्याच्या देखभालीचा खर्च देत नाही. धक्कादायक म्हणजे, संबंधित विभागांच्या डॉक्टरांना त्याचे प्रशिक्षण देत नाही. केवळ यंत्र लादून स्वत:ची पाट थोपटते. हे प्रकार अलिकडच्या काळात वाढले आहे. विशेष म्हणजे, मेडिकलमधील ईएमजी, एनसीव्ही, सीपीटीएस यासारखे अनेक यंत्र धूळखात पडले आहेत. मेंदूमधील विद्युत लहरींच्या हालचाली समजण्यासाठी ईईजी (इलेक्ट्रो एन्सेफॅलोग्रॅम) यंत्र चार वर्षांपासून सायकॅट्रिक विभागात बंद स्थितीत आहे. २०११ मध्ये तंत्रज्ञाची बदली झाल्यापासून हे यंत्र कुलुपात बंद पडले ते आजही तसेच आहे. परिणामी, मेंदूच्या वेगवेगळ्या भागांत दुखापत झाली किंवा रक्तस्राव झालेल्या रुग्णांना, एपिलेप्सीचे निदान करणाऱ्या रुग्णांना बाहेरून ईईजी काढावा लागत आहे. या संदर्भाचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच मेडिकल प्रशासनामध्ये खळबळ उडाली. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी स्वत:हून याची दखल घेत सायकॅट्रिक विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत टिपले यांच्याशी बोलून ‘ईईजी’ मशीनविषयी माहिती घेतली. डॉ. टिपले यांनी तंत्रज्ञाच्या मागणीचा प्रस्तावही पाठविला. पालकमंत्री बावनकुळे यांनीही या वृत्ताची दखल घेत चौकशी करून, कारवाई करण्याचे व अहवाल सादर करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय व मेडिकल यांना दिले. खुद्द पालकमंत्र्यांनी याची दखल घेतल्याने बंद पडलेली महत्त्वाची यंत्रे सुरू होणार की नाही याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)