शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी सदोष, पण दीर्घकाळासाठी चांगला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 01:43 IST

श्री श्री रविशंकर यांचे मत :ऑनलाईन लोकमत नागपूर : देशामध्ये अनेक धोरणे वातानुकूलित खोलीत बसून तयार केली जातात. अशी धोरणे वास्तविकतेच्या कसोटीत खरी उतरत नाहीत. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू करण्याचा निर्णयही असाच आहे. हा कायदा सदोष आहे, पण त्रुटी दूर केल्यास तो व्यापाºयांना ...

ठळक मुद्देव्यावसायिक नैतिकतेवर व्यापाऱ्यांना मार्गदर्शन

श्री श्री रविशंकर यांचे मत :ऑनलाईन लोकमत नागपूर : देशामध्ये अनेक धोरणे वातानुकूलित खोलीत बसून तयार केली जातात. अशी धोरणे वास्तविकतेच्या कसोटीत खरी उतरत नाहीत. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू करण्याचा निर्णयही असाच आहे. हा कायदा सदोष आहे, पण त्रुटी दूर केल्यास तो व्यापाºयांना दीर्घकाळासाठी लाभदायक ठरेल असे मत आर्ट आॅफ लिव्हिंगचे संस्थापक व अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केले.सीताबर्डीतील एका मॉलमध्ये येथे रविवारी ‘व्यावसायिक नैतिकता व भरभराटी’ विषयावर श्री श्री रविशंकर यांचा मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर स्वत:ची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी नोटाबंदी व हा निर्णय घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली. नोटाबंदीमुळे काळे धन व दहशतवादावर नियंत्रण मिळविण्यात यश आले. नरेंद्र मोदी हे असे धाडसी निर्णय घेणारे एकमेव पंतप्रधान आहेत. सर्वांनी मिळून त्यांचे हात बळकट केले पाहिजे असे रविशंकर यांनी सांगितले.शेतकºयांच्या आत्महत्यांसाठी अर्थव्यवस्थेतील दोष कारणीभूत आहेत. भारतामध्ये कर्जावर सर्वाधिक व्याज आकारले जाते. जगात कोणत्याही देशात एवढे व्याज नाही. अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. सामाजिक व वैचारिक क्रांती फार पूर्वीच झाली आहे. आर्थिक क्रांतीमध्ये आपण मागे आहोत. भारत गरीब नव्हता, पण इंग्रजांनी संपत्ती लुटून नेल्यामुळे आपल्याला अर्थव्यवस्थेत संघर्ष करावा लागत आहे असे रविशंकर यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी त्यांनी व्यापाºयांच्या विविध प्रश्नांना उत्तरेही दिली.अपघाताने गुरुजी झालोएका लहान मुलाने रविशंकर यांना आपण गुरुजी होण्याचा विचार कधी केला असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना रविशंकर यांनी आपण अपघाताने गुरुजी झालो असे सांगितले. अंतर्मनातील शुद्धता समाजाला सतत चांगले मार्गदर्शन करण्याची प्रेरणा देत असे. त्यातून गुरुजी होण्याकडे वाटचाल सुरू झाली अशी माहिती त्यांनी दिली.