शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीत सुधारणा होऊ शकते : हंसराज अहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 21:07 IST

जीएसटी चुकीचा नाही, हे लोकांना समजावून सांगत असताना आम्हालाही घाम फुटू लागला आहे. जीएसटीचे विधेयक हे संसदेमध्ये बहुमताने पारित झाले होते, असे असतानाही विरोधक याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात. चुकीचा प्रचार करतात. जीएसटी हा काही ब्रह्मलिखित नाही. त्यात सुधारणा होऊ शकतात. पण, बेजबाबदार वक्तव्य योग्य नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी येथे केले.

ठळक मुद्देचार्टर्ड अकाऊंटंटचे विदर्भस्तरीय अधिवेशन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जीएसटी चुकीचा नाही, हे लोकांना समजावून सांगत असताना आम्हालाही घाम फुटू लागला आहे. जीएसटीचे विधेयक हे संसदेमध्ये बहुमताने पारित झाले होते, असे असतानाही विरोधक याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात. चुकीचा प्रचार करतात. जीएसटी हा काही ब्रह्मलिखित नाही. त्यात सुधारणा होऊ शकतात. पण, बेजबाबदार वक्तव्य योग्य नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी येथे केले.द इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंटंट आॅफ इंडियाची नागपूर शाखा आणि वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने रामदासपेठ येथील एका हॉटेलमध्ये दोन दिवसीय विदर्भस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी दुपारी या परिषदेचे उद्घाटन करताना ते बोलत होते. आ. अनिल सोले प्रमुख अतिथी होते. यासोबतच वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलचे चेअरमन सीए संदीप केसी जैन, सचिव सीए पुरुषोत्तम खंडेलवाल, सीए अभिजित केळकर, नागपूर शाखेचे अध्यक्ष सीए उमंग अग्रवाल, सचिव सीए किरीट कल्याणी, साकेत बागडिया, सीए सुरेन दुरुगकर, उत्तम प्रकाश अग्रवाल, जयदीप शहा प्रामुख्याने उपस्थित होते.हंसराज अहीर म्हणाले, देशाच्या विकासासाठी करदात्यांची संख्या वाढणे आवश्यक आहे. परंतु कर देण्याची मानसिकता अजूनही लोकांच्या मनात नाही, अशा परिस्थितीत जनजागृती करून करदात्यांची संख्या वाढवण्यास चार्टर्ड अकाऊंटंट महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. तसेच जीएसटी व नोटाबंदी हा पंतप्रधानांनी घेतलेला ऐतिहासिक निर्णय आहे. देशाच्या विकासाला गती देणारा आहे. तेव्हा यासंबंधात चार्टर्ड अकाऊंटंटने लोकांमध्ये जनजागृती करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.आ. अनिल सोले म्हणाले, चार्टर्ड अकाऊंटंटवर केवळ समाज नव्हे तर देशाला उभं करण्याची महत्त्वाची जबाबदारी आहे. समाजाला आणि देशाला दिशा देण्याची महत्त्वाची भूमिका चार्टर्ड अकाऊंटंटला बजवायची आहे. सीए संदीप जैन, जयदीप शहा, अभिजित केळकर, उमंग अग्रवाल यांनीही विचार व्यक्त केले. सुरेन दुरुगकर यांनी संचालन केले.भारतीय तरुण सीएंना विदेशात प्रचंड मागणीभारतातील तरुण चार्टर्ड अकाऊंंटंटला (सीए) विदेशात प्रचंड मागणी असल्याचे वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलचे चेअरमन सीए संदीप केसी जैन यंनी पत्रकारांशी चर्चा करताना सांगितले. नुकत्याच बँकेतील घोटाळ्यात सीएंचीही भूमिका असल्यााबत पत्रकारांनी विचारले असता नियमानुसार अशा सीएंची चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहीरchartered accountantसीए