शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
2
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
3
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
4
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
5
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
6
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
7
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
8
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
9
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
10
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
11
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या
12
Viral: बंगळुरुमध्ये घरकाम करणाऱ्या बाईचा पगार ₹४५,०००; महिलेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ...
13
धक्कादायक! पतीशी वाद, रागातून आईकडूनच जुळ्या मुलांची हत्या, स्वत: चौथ्या मजल्यावरुन मारली उडी
14
तंत्र-मंत्र, जारण-मारण, गेंडे आणि म्हशी! आसाममध्ये गूढ जंगलात काळी जादू करणारं गाव
15
राऊत म्हणतात, राज ठाकरे सोबत जाण्यास इच्छूक; पण काँग्रेस नेते म्हणाले, मनसेबाबत चर्चा नाही!
16
टॅक्स फ्री ४० लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत दरमहा इतके गुंतवा अन् कोट्यधीश व्हा
17
४ मुली पदरात, नवऱ्याने सोडलं पण 'तिने' धाडस केलं; सुरू केला व्यवसाय, आता लाखोंची मालकीण
18
भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार...
19
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला

जीएसटी कायद्यात सुधारणा आवश्यक : सहआयुक्त मुकुल पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 00:33 IST

जीएसटी कायद्यात सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे मत सीजीएसटी नागपूर विभागाचे सहआयुक्त मुकुल पाटील यांनी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्देजीएसटीवर पॅनल चर्चा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जीएसटी परिषद कर भरणा करणाऱ्यांसाठी आणि जीएसटी पालन सुलभतेसाठी सतत प्रयत्नशील आहे. व्यापार आणि उद्योगाच्या प्रत्येक सूचनांवर सरकार विचार करीत आणि त्यानुसार कायद्यात बदल करून व्यापार आणि उद्योगाच्या हितासाठी वेळोवेळी तरतूद करीत आहे. जीएसटी दरातही वारंवार कपात करण्यात आली असून जीएसटी कायद्यात सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे मत सीजीएसटी नागपूर विभागाचे सहआयुक्त मुकुल पाटील यांनी येथे व्यक्त केले.आयसीएआयच्या नागपूर शाखेतर्फे धंतोली येथील सभागृहात जीएसटीवर बदलांच्या माहितीसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. १ जुलै २०१७ पासून जीएसटी लागू झाल्यानंतर त्यातील तरतुदींमध्ये वारंवार बदल करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. सीएंनी ग्राहकांना वेळेत जीएसटी रिटर्न भरण्याचा सल्ला द्यावा, अशी विनंती केली. विभागीय आघाडीवर त्यांनी जलद परतावा प्रक्रियेचा उल्लेख केला आणि कायद्याची सुविधा देणारी म्हणून विभागाच्या बदलत्या भूमिकेविषयी माहिती दिली. करदात्यांचे प्रश्न लवकर सोडविण्यासाठी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.केंद्र सरकारने आणलेल्या ‘सबका विश्वास’ या विवाद निराकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी सीएंनी ग्राहकांना प्रवृत्त करावे. ही योजना ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. सीजीएसटी अधीक्षक सुरेश रायुलू यांनी सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.प्रारंभी आयसीएआयच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष सीए सुरेन दुरगकर यांनी नागपूर शाखेतर्फे वेळोवेळी जीएसटी जागृतीसाठी घेण्यात येणाºया कार्यक्रमांची माहिती दिली. पॅनेल चर्चेत सीए सतीश सारडा, सीए रितेश मेहता, सीए जय पोपटानी, सीए प्रीतम बत्रा, सीए कुणाल बुधराज, सीए रेणुका बोरोले, सीए आशिष मुंदडा आणि सीए हेमंत राजंदेकर यांनी जीएसटीच्या विविध विषयावर मत व्यक्त केले. संचालन सचिव सीए साकेत बागडिया आणि सीए हरीश रंगवानी यांनी केले. आभार उपाध्यक्ष किरीट कल्याणी यांनी मानले. याप्रसंगी सीए अभिजित केळकर, सीए संजय अग्रवाल, सीए जितेन सागलानी, सीए अक्षय गुल्हाने आणि शाखेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :GSTजीएसटीchartered accountantसीए