शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

गटबाजी व खंडणीबाजी चालणार नाही

By admin | Updated: November 7, 2015 03:22 IST

शिवसेना हा लोकांच्या मदतीसाठी धावून जाणारा, त्यांना न्याय देणारा पक्ष आहे अशी प्रतिमा सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाली पाहिजे.

अनिल परब यांनी उपटले कान : शिवसेना पदाधिकारी व कार्यक र्त्यांचा मेळावानागपूर : शिवसेना हा लोकांच्या मदतीसाठी धावून जाणारा, त्यांना न्याय देणारा पक्ष आहे अशी प्रतिमा सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाली पाहिजे. लोकोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून शिवसेना घराघरांत पोहचवा. पक्षात गटबाजी व खंडणीबाजी चालणार नाही, असा इशारा शिवसेनेचे नागपूर शहर संपर्क प्रमुख अ‍ॅड. आमदार अनिल परब यांनी शुक्रवारी दिला. शिवसेनेचे आक्रमक नेते म्हणून ओळख असलेले अनिल परब यांनी नागपूर शहराच्या संपर्क प्रमुख पदाची सूत्रे हाती घेतली आहे. त्यांच्या उपस्थितीत प्रथमच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यक र्त्यांचा मेळावा शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. परब कोणती भूमिका मांडतात याची कार्यकर्त्यांना उत्सुकता होती. यावेळी नागपूर शहर जिल्हा प्रमुख सतीश हरडे, किरण पांडव,मंगेश काशीकर, सूरज गोजे, किशोर कुमेरिया, ओमप्रकाश पारवे, राजेश कनोजिया, बंडू तळवेकर, रामचरण दुबे आदी उपस्थित होते.संघटनेत घटनात्मक पदेच अधिकृत आहेत. घटनाबाह्य कोणतेही पद खपवून घेणार नाही. आपसात न लढता समाजात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची चांगल्या कामासाठी ओळख निर्माण झाली पाहिजे. संघटनेत शाखा प्रमुख हे महत्त्वाचे पद आहे. पक्षात मतभेद असले तरी पक्षाचा आदेश हा सर्वांना मानावाच लागेल. यात कोणत्याही स्वरूपाची तडजोड नाही. मला प्रामाणिक व लढणारे कार्यकर्ते हवे आहे. चांगले काम असेल तर निवडणुकीत उमेदवारी मिळेल. कुणाचाही वशिला वा दबाव राजकारण खपवून घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. नागपूर शहरात विधानसभा मतदार संघानिहाय पक्षाची बांधणी करण्यात येणार आहे. यासाठी पक्षाने सोपविलेली जबाबदारी कार्यक र्त्यांना पार पाडावीच लागेल. सोबतच पदाधिकारी व कार्यक र्त्यांनी जनसंपर्क वाढवावा. यासाठी रक्तदान व अन्य सामाजिक उपक्रम हाती घ्यावे. लोकांचा विश्वास संपादन करावा. यासाठी सर्व शिवसैनिकांनी एकजुटीने कामाला लागावे, असे आवाहन परब यांनी केले. वर्षभराने नागपूर महापालिकेची निवडणूक असल्याने परब काय आदेश देतात याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले होते. या वेळी राजेश कनोजिया, चिंटू महाराज, विशाल बरबटे, हितेश यादव, प्रतीक बालपांडे, राहुल हरडे, आशीष मनपिया, सुरेखा खोब्रागडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)