शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती उड्डाण पूल तुटल्याचे दु:ख

By admin | Updated: November 17, 2016 02:52 IST

विशेष महत्त्वाच्या व्यक्तींना विमानतळापासून विनाअडथळा प्रवास करता यावा,

सदाशिव माने यांची प्रतिक्रिया : छत्रपती उड्डाण पुलाचे बांधकामनागपूर : विशेष महत्त्वाच्या व्यक्तींना विमानतळापासून विनाअडथळा प्रवास करता यावा, हा उद्देश ठेवून विशेष परिश्रमाने आणि नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून १८ वर्षांपूर्वी बांधलेला छत्रपती उड्डाण पूल तोडताना दु:ख आणि मनाला वेदना होत असल्याची प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता (निवृत्त) सदाशिव माने यांनी लोकमतशी बोलताना दिली. त्या काळात हा विदर्भातील पहिला उड्डाण पूल होता. बांधकामासाठी ५.२५ कोटींचा खर्च आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पहिल्यांदा मशरुम आकाराचा पिलरमाने म्हणाले, त्यावेळी मिहान प्रकल्प उभारण्याचा विचार होता. मिहानमधील वाहतूक आणि हलकी वाहने सुरळीत जावीत, हा सुद्धा उद्देश होता. त्यावेळी प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते. मशरुम आकाराचा पिलर हे तंत्रज्ञानाचे मोठे स्वरूप आहे. हे पिलर आजही ‘जैसे थे’ असून जागेवरच तयार करण्यात आले. खापरीजवळील यार्डमध्ये २० मीटरचे गर्डर तयार करण्यात येत होते. ते नंतर विशेष तंत्रज्ञानाच्या आधारे पिलरवर टाकण्यात येत होते. त्यावेळी बांधकाम खात्याची संपूर्ण चमू कामावर लक्ष द्यायची. यार्डमध्ये काँक्रिटला मजबूती येण्यासाठी पाण्याऐवजी वाफेचा उपयोग करण्यात आला. त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणे सोपे व्हायचे. प्रत्येक पिलरला क्रॉस गर्डरने जोडले आहे. त्यामुळे १०० मीटरचा गर्डर अखंड वाटतो. पुलाच्या डिझाईनला एक वर्ष लागल्याचे माने म्हणाले.झिरो माईल्सजवळ पिलर उभाछत्रपती उड्डाण पुलासाठी बांधण्यात आलेला पिलर मशरुम आकाराचा आहे. पूर्वी या पिलरचे चार डिझाईन तयार करण्यात आले, पण पाचव्या पिलरच्या डिझाईनला मंजुरी देण्यात आली. या पिलरला कुठेही जोड नाही. तो अखंड उभा आहे. मुख्य अभियंते देवदत्त मराठे यांनी पिलरचे डिझाईन तयार केले. हा पूल एवढा मजबूत आहे की, १०० वर्षे काहीही होणार नाही. पुलाची निर्मिती आम्ही केली आहे, पण तुटताना दु:ख होत असल्याचे माने यांनी सांगितले. युती सरकारच्या काळात बांधकामयुती सरकारच्या काळात नितीन गडकरी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री असताना पुलाचे बांधकाम झाले. आॅगस्ट १९९७ मध्ये बांधकाम सुरू झाले आणि नोव्हेंबर २००० मध्ये पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. पूल एकूण ४०० मीटरचा असून, प्रत्येक पुलाचे बांधकाम १०० मीटरचे आहे आणि दोन्ही बाजूला अ‍ॅप्रोच रस्ता ३०० मीटर आहे. १०० मीटर पूल पाच टप्प्यात अर्थात १०० मीटर गर्डरने निर्मिती करण्यात आली. २० मीटरच्या स्पॅनमध्ये १४ गर्डर टाकण्यात आले आणि त्यांना तारेने दाब देऊन बांधण्यात आले.