शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन

By admin | Updated: January 24, 2016 02:46 IST

भारतीय स्वतंत्रता संग्रामाच्या लढ्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे योगदान इतिहासात अजरामर असे आहे.

नागपूर : भारतीय स्वतंत्रता संग्रामाच्या लढ्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे योगदान इतिहासात अजरामर असे आहे. आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून इंग्रज सरकारला धडकी भरविणाऱ्या नेताजींनी देशातच नाही तर परदेशातही भारतीयांच्या संघटना स्थापन करून स्वांतत्र्याचा लढा लढला. शनिवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त नागपुरातील विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांनी त्यांना अभिवादन केले.हिंदू महासभाहिंदू महासभेच्या नागपूर महानगर शाखेतर्फे शनिवारी शाखेच्या कार्यालयात सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. नेताजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अरुण जोशी यांनी नेताजींच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. इंग्रजांना हादरविणाऱ्या नेताजींच्या कट्टर राष्ट्रभक्ती आणि साहसी ध्येयाबद्दल सुभाषबाबू कायम स्मरणात राहतील, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशिष मुडे यांनी केले. अनंत पाध्ये यांनी आभार मानले.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात आली. रेल्वेस्टेशन रोड, मानव चौक येथील नेताजींच्या पुतळ्याला माल्यार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अनिल हिवरकर, ईश्वर बाळबुधे, महिंद्र भांगे, संजय शेवाळे, चरणजितसिंग चौधरी, अशोक आडिकणे, शैलेंद्र तिवारी, नरेंद्र पुरी, रिजवान अन्सारी, आशिष नाईक, दिनकर वानखेडे, शाबीर शेख, अब्दुल कादीर शेख, शहबाज खान, रुद्र ढाकळे आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.शहर काँग्रेस सेवादलनेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त नागपूर शहर काँग्रेस सेवादलाच्या वतीने नेताजींना अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सेवादलाचे मुख्य संघटक रामगोविंद खोब्रागडे, शंकरलाल बैसवारे, स्मिता कुंभारे, वासुदेव महल्ले, रत्नमाला फोपरे, सुरेश भोयर, फुलवंती साखरे, गोविंदा उरकु डे, शुभांगी स्वामी, रतनलाल रंगारी, लता पारपिल्लेवार, प्रभुदास तायवाडे, सुनीता शेंडे, गंगाधर नागपुरे, विद्युलता उके, अरुण अनासाने, बबनराव दुरुगकर, विठ्ठल दांडेकर आदींचा सहभाग होता.सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ फार्मसीगोधनी येथील सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ फार्मसी येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जयंती कार्यक्रमाला माजी मंत्री अनिस अहमद, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मो. सलीमुद्दीन फारुकी, लोणारा फार्मसी कॉलेजचे प्राचार्य शरद भांडारकर, डॉ. आरिफ खान, फारुक हसन, पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य विनय मानकर, प्रा. मो. बाबर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्राचार्य फारुकी यांनी केले. महाविद्यालयाच्या उपप्राचार्या विजयालक्ष्मी सोळंकी यांनी आभार मानले.विभागीय आयुक्त कार्यालय विभागीय आयुक्त कार्यालयात शनिवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी करण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार सुजाता गावंडे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाचे सुरेश भगत, प्रमोद जोंधुळकर, जॉन मॅथ्यु व इतर अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)