शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
3
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
4
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
5
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
6
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
7
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
8
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
9
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
10
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
11
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
12
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
13
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
14
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
15
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
16
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
17
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
18
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
19
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
20
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?

रक्तदान करून महामानवाला अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:07 IST

नागपूर : काेराेनाच्या महामारीमुळे परिस्थिती भयंकर झाली असून, वैद्यकीय सेवा डगमगायला लागली आहे. या परिस्थितीत रुग्णालयात रक्ताचाही तुटवडा जाणवत ...

नागपूर : काेराेनाच्या महामारीमुळे परिस्थिती भयंकर झाली असून, वैद्यकीय सेवा डगमगायला लागली आहे. या परिस्थितीत रुग्णालयात रक्ताचाही तुटवडा जाणवत आहे. अशावेळी तरुणांनी पुढाकार घेत रक्तदान अभियान चालविले आहे. महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयाेजन केले जात आहे.

प्रियदर्शी सम्राट अशाेक बहुउद्देशीय संस्थेच्या तरुणांनी जयंतीनिमित्त बुधवारी रक्तदान शिबिर आयाेजित केले. संस्थेचे संयाेजक अनिकेत कुत्तरमारे यांनी सांगितले, यापूर्वीही १४ ऑक्टाेबर, २५ ऑक्टाेबर, ६ डिसेंबर आणि सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून दक्षिण नागपुरातील विविध विहारांमध्ये रक्तदान शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यातून रक्ताच्या १८० पिशव्यांचा पुरवठा मेडिकल रुग्णालयाला करण्यात आला. मेडिकल प्रशासनाकडूनही रक्ताची गरज असल्याचे सांगून रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले. आता पुन्हा १४ एप्रिल राेजी कुकडे ले-आउट परिसरात भव्य रक्तदान शिबिराचे आयाेजन करून ५० पिशव्या रक्त गाेळा करण्यात आले. अजनी पोलीस स्टेशनचे एपीआय शीतलकुमार गायकवाड, तहसीलदार प्रताब वाघमारे, रिपब्लिक मुव्हमेंटचे नरेश वाहने, यशवंत बागडे आदी प्रामुख्याने उपस्थित हाेते. महामानवाच्या जयंतीनंतरही रक्तदानाचे अभियान सातत्याने घेण्याचा निर्धार अनिकेतने ‘लाेकमत’शी बाेलताना केला. आयोजनात सिद्धार्थ बनसोड, वैशाली गुटके, शुभम दामले, मीनल मेश्राम, दीक्षिता बनसोड, शीतल गडलिंग, प्रशिक वाहने आदींचा सहभाग हाेता.

१३० बुद्ध विहारांमध्ये वृक्षाराेपण

महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३०व्या जयंती दिनी समता सैनिक दलाच्या माध्यमातून शहरातील १३० बुद्ध विहारांमध्ये वृक्षाराेपण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. दलाचे सैनिक प्रशिक वाहने यांनी सांगितले, १२, १३ आणि १४ एप्रिल राेजी विविध बुद्ध विहारांमध्ये हे अभियान राबविले. माेजक्या लाेकांच्या उपस्थितीत कोरोनासंबंधी नियम पाळून वृक्षाराेपण करण्यात आले.