डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त जाटतरोडी चाैक येथे संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून महामानवाला अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी राहुल मून, जितेंद्र जिभे, राजू गायकवाड, राजेंद्र साठे, ॲड. सुरेशचंद्र घाटे, मिलिंद खोब्रागडे, विनोद मेश्राम, चंद्रामणी उके, अनिता मेश्राम, जयश्री मून, प्रज्ज्वल मून, प्रज्ज्वल जिभे आदी उपस्थित हाेते.
समता सैनिक दलातर्फे रक्तदान
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समता सैनिक दल, समता आराेग्य प्रतिष्ठान, इंदाेरा बुद्धविहार, उडान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दी बुद्धा चॅरिटेबल ट्रस्ट येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयाेजन करण्यात आले. या वेळी दलाच्या मुख्य कार्यवाहक ॲड. स्मिता कांबळे, इंदाेरा बुद्धविहाराचे सचिव अमित गडपायले, उडान संस्थेचे मुकेश उके, दीपक बागडे, राजेश लांजेवार, विश्वास पाटील, आनंद पिल्लेवान, प्रफुल्ल मेश्राम, टारझन ढवळे, गाैतम पाटील, सुखदास बागडे, दिशू कांबळे, चकार पाटील, अजय बागडे, प्रज्वल बागडे, अरुण भारशांकर, टारझन दहिवले, आनंद तेलंग, विनाेद बन्साेड, प्रसेनजीत सूर्यवंशी आदींचा सहभाग हाेता.
विचारमंथनची सांगता आज
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘खूप लढलाे बेकीने, आता लढूया एकीने’ टीमच्या वतीने ७ एप्रिलपासून ‘विचारमंथन’ या वैचारिक प्रबाेधन कार्यक्रमाचे ऑनलाइन आयाेजन केले. तरुणांसमाेरील शिक्षण, बेराेजगारीच्या समस्या, मुलांमध्ये टीव्ही, माेबाइलचे वाढलेले वेड, तरुणांमधील वाढती व्यसनाधीनता अशा विविध विषयांवर या सात दिवसांत चर्चा करण्यात आली. १४ एप्रिल राेजी या वैचारिक उत्सवाची सांगता झाली. अतुल खाेब्रागडे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी आयाेजन केले. अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमात सहभागी हाेऊन मार्गदर्शन केले.