शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मोहाफुलांच्या संकलनासाठी आता ग्रीन नेट : वनविभागाचा नवा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 00:52 IST

उन्हाळा आला की मोहाफुलांच्या संकलनाची लगबग सुरू होते. अनेक आदिवासींसाठी हे उपजीविकेचे साधन आहे. मात्र या काळात जंगलांना आगीही लागतात. हे टाळण्यासाठी आणि जैव विविधतेच्या रक्षणासाठी मोहाफुले वेचण्यासाठी आणि संकलनासाठी ग्रीन नेटचा वापर केला जात आहे.

ठळक मुद्देजैवविविधतेच्या संवर्धनासाठी पाऊल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उन्हाळा आला की मोहाफुलांच्या संकलनाची लगबग सुरू होते. अनेक आदिवासींसाठी हे उपजीविकेचे साधन आहे. मात्र या काळात जंगलांना आगीही लागतात. हे टाळण्यासाठी आणि जैव विविधतेच्या रक्षणासाठी मोहाफुले वेचण्यासाठी आणि संकलनासाठी ग्रीन नेटचा वापर केला जात आहे. नागपूरवनविभागाच्या कार्यक्षेत्रातील काही वनपरिक्षेत्रामध्ये प्रायोगिक स्तरावर हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.नागपूर वनविभागात दीड लाख हेक्टर जंगलाच्या भागात जवळपास ५३३ गावे आहेत. विदर्भातील अनेक गावांसाठीही जंगल हे उपजीविकेचे साधन आहे. मोहाफुलांच्या काळात जंगलांना आगी लागण्याच्या घटना अधिक घडतात. त्या टाळण्यासाठी व जंगलाच्या रक्षणाच्या हेतूने ही संकल्पना प्रायोगिक स्तरावर अस्तित्वात आणली आहे. यानुसार, मोहफुल असलेल्या झाडाखाली ग्रीन नेट बांधायची, झाडावरून पडणारी मोहाफुले त्या ग्रीन नेटमध्ये पडतील, दुसऱ्या दिवशी सकाळी अवघ्या १५ मिनिटात फुले गोळा करून जाता येईल.अनेक धोके टळणारयामुळे अनेक धोके टळू शकतात. पडलेली मोहाफुलें पालपाचोळ्यातून वेचायला लागणारा वेळ वाचणार आहे. मोहाफुलासाठी लावल्या जाणाºया आगीच्या घटना टळणार आहेत. जमिनीवर पडलेली मोहाफुले प्राणी खायचे थांबणार. महत्त्वाचा टळणारा धोका म्हणजे, मोहाफुले वेचण्यासाठी तासन्तास झुकावे लागायचे. व्यक्तीवर वाघाचे हल्ले व्हायचे. या प्रक्रियेत लोकांचा जीव थोडाफार सुरक्षित झाला आहे.या नाविन्यपूर्ण पध्दतीचे फायदे लक्षात आले आहेत. त्यामुळे यापुढे दरवर्षी याच पध्दतीने संयुक्त वन व्यवस्थापन समितीमार्फत बचत गटांना व गावकऱ्यांना ग्रीन नेट पध्दतीची जनजागृती करुन हा प्रकल्प राबविण्याचे नियोजन आहे. डॉ. प्रभूनाथ शुक्ल, उपवनसंरक्षक, नागपूर वनविभाग, नागपूर

टॅग्स :forest departmentवनविभागnagpurनागपूर