शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

‘ए’ रक्तगटाला कोरोनाचा धोका अधिक, ही निव्वळ अफवाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 11:07 IST

‘ए’ रक्तगट असलेल्यांना कोरोनाचा सर्वात अधिक धोका तर ‘ओ’ रक्तगट असलेल्या लोकांना कमी धोका असल्याचे समोर येत आहे. परंतु हे वृत्त चुकीचे असल्याचे प्रसिद्ध फिजिशियन डॉ. जय देशमुख यांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्दे यासंदर्भात कुठलेही पुरावे नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संशोधनाच्या नावाखाली आता कोरोना विषाणूची अफवा पसरवली जात आहे. यात ‘ए’ रक्तगट असलेल्यांना कोरोनाचा सर्वात अधिक धोका तर ‘ओ’ रक्तगट असलेल्या लोकांना कमी धोका असल्याचे समोर येत आहे. परंतु हे वृत्त चुकीचे असल्याचे प्रसिद्ध फिजिशियन डॉ. जय देशमुख यांचे म्हणणे आहे. त्यांच्यानुसार, या संदर्भात कुठलेही पुरावे उपलब्ध नाहीत. कोरोनाची भीती पसरविण्याचे हे एक निमित्त असू शकते, असेही डॉ. देशमुख म्हणाले.एका ब्रिटिश वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, वुहानमधील वैज्ञानिकांनी सुमारे २१७३ कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांचा अभ्यास केला. यात सुमारे ३८ टक्के लोकांचा रक्तगट ‘ए’ होता. तर ‘ओ’ रक्तगट असलेल्या रुग्णांची २६ टक्के होती. या शिवाय, हुबेई प्रांतातील तीन रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये सुमारे २०६ लोकांचा मृत्यू झाला. यापैकी ८५ मृतांचा रक्तगट ‘ए’ होता. असेच संशोधन दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये करण्यात आले असता ‘ए’ रक्तगट असणारे लोकच कोरोनाचे जास्त बळी ठरल्याचे दिसून आल्याचेही वृत्तात म्हटले आहे. सध्या हे वृत्त ‘सोशल मीडियावर’ व्हायरल झाले आहे. ‘ए’ रक्तगट असलेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे, तर ‘ओ’ रक्तगट असलेल्या लोकांना रान मोकळे झाले आहे.हे वृत्त मात्र चुकीचे असल्याचे डॉ. देशमुख यांचे म्हणणे आहे. त्यांच्यानुसार, वुहानमध्ये सर्वात जास्त नागरिक ‘ए’ आणि ‘ओ’ रक्तगटाचे आहेत. यामुळे तिथे तो अभ्यास झाला असलातरी भारतात तो लागू होईल असे नाही. तसेच या संदर्भातील प्रसिद्ध झालेली आकडेवारी वेगवेगळ्या ग्रुपवर वेगवेगळी आहे. महत्त्वाचे म्हणजे, या वृत्ताला घेऊन कुठलेही पुरावे सादर करण्यात आलेले नाहीत. यामुळे कुठलाही रक्तगट असला तरी प्रतिबंधात्मक उपाययोजना न केल्यास या रोगाची लागण होण्याची शक्यता असतेच. ‘जर’ तुमचा ‘ए’रक्तगट असेल तर घाबरून जाण्याचे कारण नाही. कारण कोरोना केवळ याच रक्तगटालाच होतो असेही पुरावे नाहीत. ‘ओ’ रक्तगट असणाऱ्या कोरोना होत नाही, ते पूर्णपणे सुरक्षित आहेत, असेही नाही. जर तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल, तुम्ही वारंवार हात धुवत असाल, स्वच्छता राखत असाल तर कोरोनाला घाबरण्याची गरज नाही. मात्र खबरदारी घेणे आवश्यक आहे, असेही डॉ. देशमुख म्हणाले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस