शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नागनदी सौंदर्यीकरणाचा १६०० कोटींचा बृहत् आराखडा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 23:24 IST

नागपूर शहरातील नागनदीला गतवैभव प्राप्त करण्यासाठी नदी पुनरुज्जीवनासाठी फ्रान्स डेव्हलपमेंट एजन्सी(एएफडी)ने पुढाकार घेतला आहे. एएफडी फ्रान्सचे गॉटीएर कोहलेर, एएफडी दिल्लीच्या व्हॅलेन्टाईन लेनफन्ट यांनी गुरुवारी नागनदीच्या दर्शनी भागाच्या सौंदर्यीकरण प्रकल्पाचा १६०० कोटींचा बृहत् आराखडा महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे सुपूर्द केला.

ठळक मुद्देफ्रान्स डेव्हलपमेंट एजन्सीच्या सहकार्याने विकास : मनपा आयुक्तांना आराखडा सुपूर्द

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरातील नागनदीला गतवैभव प्राप्त करण्यासाठी नदी पुनरुज्जीवनासाठी फ्रान्स डेव्हलपमेंट एजन्सी(एएफडी)ने पुढाकार घेतला आहे. एएफडी फ्रान्सचे गॉटीएर कोहलेर, एएफडी दिल्लीच्या व्हॅलेन्टाईन लेनफन्ट यांनी गुरुवारी नागनदीच्या दर्शनी भागाच्या सौंदर्यीकरण प्रकल्पाचा १६०० कोटींचा बृहत् आराखडा महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे सुपूर्द केला.महापालिकेने पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून नद्यांच्या संबंधात दोन प्रकल्प हाती घेतलेले आहेत. पहिला प्रकल्प नागनदी प्रदूषण निर्मूलनाचा आहे. नागनदीमध्ये वाहणारे सांडपाणी थांबवून त्यावर प्रक्रिया करून नदीमध्ये पुन्हा सोडणे तसेच उत्तर सिवरेज झोन व मध्य सिवरेज झोनअंतर्गत सांडपाण्याची निर्मिती व निस्सारणासंबंधित पहिला प्रकल्प आहे. यासाठी केंद्र शासनाद्वारे मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. याशिवाय वित्तीय व्यवस्थापनाकरिता जिका (जपान) संस्थेद्वारे राज्य व केंद्र शासनाला वित्तीय मदत मंजुरी प्राप्त आहे. १२५२.३३ कोटीचा हा प्रकल्प आहे.यासंदर्भात १० ते १३ डिसेंबरदरम्यान एएफडी चमूने नागपूर महापालिकेला भेट दिली. शहरातील वनामती येथे प्रकल्पासंबंधी तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यशाळेमध्ये नागपूर महानगरपालिका, महामेट्रो, व्हीएनआयटी, नीरी, सामाजिक संस्था, नागपूर सुधार प्रन्यास, वन विभाग, कृषी विद्यापीठ, स्मार्ट सिटी, एनईएसएल व इतर भागधारक यांना आमंत्रित करण्यात आले. प्रकल्पाची वेगवेगळ्या स्तरावर गट तयार करून चर्चा करण्यात आली. पूर व्यवस्थापन, गतिशीलता, पुनर्वसन, जैवविविधता, पर्यावरण व वेगवेगळ्या विभागाचे समन्वयन याबाबत चर्चा करून, प्रकल्पांतर्गत करण्यात आलेल्या कामाचे प्राधान्य ठरविण्यात आले.मनपाचे नदी चमू प्रमुख व तांत्रिक सल्लागार मो. इसराईल यांनी कार्यशाळेचे समन्वयन केले. नदी व सरोवरे प्रकल्प अधिकारी मो. शफीक, संदीप लोखंडे, डॉ. प्रणिता उमरेडकर यांनी कार्यशाळेसाठी सहकार्य केले. आयुक्त अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, राम जोशी, अझीझ शेख, उपायुक्त राजेश मोहिते यांनी प्रामुख्याने कार्यशाळेमध्ये सहभाग घेतला. एएफडी फ्रान्सचे गॉटीएर कोहलेर, एएफडी दिल्लीच्या व्हॅलेन्टाईन लेनफन्ट, सिबीला जान्सिक, पी.के. दास असोसिएशनचे समर्थ दास, मिसाका हेत्तीयारच्ची, प्रियंका जैन आदी उपस्थित होेते. ब्लेंझ वार्लेट यांनी संचालन करून नियोजनाबाबत महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

टॅग्स :Naag Riverनाग नदीFranceफ्रान्स