शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महिलांना अन्न प्रक्रिया उद्योगात अपार संधी : निश्चय शेळके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 23:48 IST

देशात अन्न प्रक्रिया उद्योग वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. या उद्योगात महिलांना अपार संधी आहे. डिक्कीने हजार महिलांना रोजगार देणाऱ्या अगरबत्ती क्लस्टरसाठी प्रयत्न केले. आता मिहानमध्ये फूड क्लस्टर स्थापनेसाठी जागेची मागणी केली असून महिलांचे उद्योग त्या ठिकाणी स्थापन होणार असल्याचे प्रतिपादन दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीच्या (डिक्की) पश्चिम भारताचे अध्यक्ष निश्चय शेळके यांनी केले.

ठळक मुद्दे डिक्कीतर्फे महिला उद्योजिका परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात अन्न प्रक्रिया उद्योग वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. या उद्योगात महिलांना अपार संधी आहे. डिक्कीने हजार महिलांना रोजगार देणाऱ्या अगरबत्ती क्लस्टरसाठी प्रयत्न केले. आता मिहानमध्ये फूड क्लस्टर स्थापनेसाठी जागेची मागणी केली असून महिलांचे उद्योग त्या ठिकाणी स्थापन होणार असल्याचे प्रतिपादन दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीच्या (डिक्की) पश्चिम भारताचे अध्यक्ष निश्चय शेळके यांनी केले.जागतिक महिला दिनानिमित्त डिक्कीच्या विदर्भ चॅप्टरतर्फे महिला उद्योजिकांसाठी ‘उद्योजकता विकास परिषदे’चे आयोजन हॉटेल सेंटर पॉईंट येथे शुक्रवारी करण्यात आले. व्यासपीठावर डिक्की महिला विंगच्या राष्ट्रीय मार्गदर्शक सीमा कांबळे, जेट एअरवेजच्या कायदेविषयक सल्लागार मीनल नाईक, केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे वरिष्ठ विपणन अधिकारी डॉ. जितेंद्र डोंगरे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वरिष्ठ जिल्हा समन्वयक ललिता दारोडकर, व्हीआयए लेडीज विंगच्या अध्यक्षा रिता लांजेवार, डिक्की महाराष्ट्रचे अध्यक्ष संतोष कांबळे, विदर्भाचे अध्यक्ष गोपाल वासनिक, डिक्की वेस्ट इंडियाचे बँकिंग विषयक सल्लागार विजय सोमकुंवर, डिक्की महाराष्ट्र महिला विंगच्या अध्यक्ष चित्रा उबाळे, राज्य मार्गदर्शक विनी मेश्राम, लोकमत सखी मंचच्या नेहा जोशी उपस्थित होते.शेळके म्हणाले, महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी डिक्कीतर्फे मार्गदर्शन आणि मदत करण्यात येत आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन उद्योजिका व्हावेत. गोपाल वासनिक म्हणाले, शासनाच्या योजनेंतर्गत आणि डिक्कीच्या प्रयत्नांमुळे अनेकांना ट्रँकर आणि पेट्रोल पंप मिळाले आहेत. शिवाय अनेकांनी स्टार्ट अप योजनांचा लाभ मिळाला आहे. महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी डिक्कीतर्फे सर्वोतोपरी मदत करण्यात येते. महिला शैक्षणिकदृष्ट्या सक्षम असून उद्योग सुरू करून स्वत:च्या पायावर उभे राहावे. जितेंद्र डोंगरे यांनी उद्योग सुरू करण्यासाठी केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. अन्न प्रक्रिया उद्योगात भरपूर संधी आहे. त्याचा महिलांनी लाभ घ्यावा.सत्रांत राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना, अन्न प्रक्रिया उद्योग आणि महिलांपुढील आव्हानांवर चर्चा करण्यात आली. यावेळी डिक्कीच्या यशस्वी महिला उद्योजिकांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी डिक्कीच्या पदाधिकारी क्रांती गेडाम, रिता पोटपोसे, महिला उद्योजिका, महिला, युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

टॅग्स :Womenमहिलाbusinessव्यवसाय