शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आजार विकणारे उपाहारगृह, हॉटेल्सवर कारवाईचा बडगा

By admin | Updated: August 7, 2014 22:49 IST

सहा उपाहारगृहांना ठोक ले सील, दहा उपाहारगृहांना नोटीस

अकोला : अस्वच्छ स्वयंपाकगृहामध्ये तयार करण्यात आलेले खाद्य पदार्थ विक्री करून शहरातील नागरिकांना आजार वाटणार्‍या हॉटेल्स व उपाहारगृहांवर महानगरपालिका, अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा बडगा उभारला आहे. लोकमतने स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून खाद्य पदार्था बनविणार्‍या जागा किती अस्वच्छ आणि तयार करणार्‍यांकडून किती निष्काळजीपणा होतो हे वास्तव बुधवारी उजेडात आणले होते. त्याची दखल घेत मनपाने बुधवारी सकाळीच कारवाईला सुरुवात करीत शहरातील नामवंत ६ उपाहारगृह, हॉटेल्स व भोजनालयांना सील लावले. मनपासोबतच अन्न व औषध प्रशासन विभागानेही दहा उपाहागृहांना नोटीस दिली तर चार उपाहारगृहांना दंड ठोठावला. अकोला शहराच्या इतिहासात प्रथमच दोन्ही प्रशासकीय यंत्रणांनी संयुक्तपणे राबवलेली कारवाई अकोलेकरांच्या उत्सुकतेचा विषय ठरली. शहरात उपाहारगृह, हॉटेल्स व भोजनालयांचा मोठा व्यवसाय आहे. या व्यवसायातून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. अकोलेकरांच्या खिशातून वसूल केल्या जाणार्‍या पैशांच्या मोबदल्यात त्यांना खाद्य पदार्थांसोबत नानाविध आजारांचीही विक्री हॉटेल व उपाहारगृह व्यावसायिकांकडून होत असल्याचे ह्यलोकमतह्णने उघडकीस आणले. शहरातील अनेक प्रतिष्ठित व नामवंत हॉटेल्स, उपाहारगृह तसेच भोजनालयांमधील स्वयंपाकगृह (किचन) अतिशय अस्वच्छ व किळसवाणे असल्याचे लोकमत चमूने केलेल्या पाहणीत दिसून आले. अस्वच्छ भांडे, दूषित पाणी, निकृष्ट धान्या वापरून खाद्यपदार्थ विक्री करताना स्वच्छतेचे सर्व निकष सर्रासपणे पायदळी तुडविल्या जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर येताच, मनपा प्रशासनाने बुधवारी सकाळीच धडक मोहिम सुरू केली. प्रभारी आयुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्या आदेशानुसार आरोग्य व स्वच्छता विभागाने नामवंत सहा उपाहारगृह-भोजनालयांना सील लावले. यामध्ये प्रामुख्याने मध्यवर्ती बस स्थानकावरील पारिका यांचे ह्यकॅन्टीनह्ण, झुणका भाकर केंद्र, रेल्वे स्थानक चौकातील आनंद भोजनालय, गुजराती स्विटमार्ट तसेच सिंधी कॅम्पस्थित बालाजी स्वीटमार्टचा समावेश आहे. या कारवाईत अन्न व औषध प्रशासन विभागाने सुद्धा उडी घेत, शहरासह ग्रामीण भागातील दहा उपाहारगृहांना नोटीस जारी केल्या तसेच चार उपाहारगृहांना दंड ठोठावला. दोन्ही प्रशासकीय यंत्रणांनी एकाच दिवशी धडक मोहीम राबवल्याने खाद्य पदार्थांची विक्री करणार्‍यांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.