शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मुलगी अन नातवाच्या संघर्षाला आजीचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 22:26 IST

अचानक जावयाचे निधन झाले अन मुलीच्या संसारावर संकटाचा डोंगर कोसळला. नातवाचे ऐन दहावीचे पेपर सुरू होते त्यावेळी. या परीक्षा घेणाऱ्या परिस्थितीत डोक्यावरचा पदर कमरेला खोचणारी मुलगी व नातवाच्या संघर्षात मिळालेला आजीचा आधार जगण्याचे बळ देणारा ठरला.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : परिस्थितीचे संकट कधी व कसे येईल, हे सांगता येत नाही. तुकडोजी चौकात फूटपाथवर नातवाला घेऊन भाजीपाला विकणाऱ्या आजीने ते सांगितले. अगदी चारच महिन्यापूर्वी मुलीच्या आयुष्यात सर्व सुरळीत सुरू होते. संसार गरिबीचा असला तरी समाधानाचा होता पण अचानक जावयाचे निधन झाले अन मुलीच्या संसारावर संकटाचा डोंगर कोसळला. नातवाचे ऐन दहावीचे पेपर सुरू होते त्यावेळी. या परीक्षा घेणाऱ्या परिस्थितीत डोक्यावरचा पदर कमरेला खोचणारी मुलगी व नातवाच्या संघर्षात मिळालेला आजीचा आधार जगण्याचे बळ देणारा ठरला.शांताबाई हटवार (७०) रा. नीलज खंडाळा, असे या आजीचे नाव आहे. त्यांची मुलगी कल्पना तळेकर ही मानेवाडा रोडवर बजरंगनगरात राहते. जावई लहानु तळेकर हेही भाजीपाला विक्रेते होते. परंतु मार्च महिन्यात हार्टअटॅकने त्यांचे निधन झाले. मुलगा रविकांत त्यादिवशी दहावीचा पहिलाच पेपर द्यायला गेला होता. घरातील कमावती तरुण व्यक्ती अशी अचानक सोडून जाण्याने कुटुंबावर संकट येणे सहाजिक होतेच. हे संकट आर्थिकही होते आणि सामाजिकही. कल्पना यांना भाजीपाला विक्रीचा अनुभव होता पण केवळ पतीसमवेत असताना. मात्र उत्पन्नाचे साधनच बंद झाले आणि त्यांनी परिस्थितीचे आव्हान स्वीकारत पतीचा भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू केला. या कामात त्यांचा मुलगा रविकांतही त्यांना मदत करीत आहे. परंतु मुलीवर आलेल्या संकटामुळे आजी शांताबाई अस्वस्थ झाल्या. त्यांना दोन मुले असून ते शेती करतात. कठीण परिस्थितीत भावांनीही कल्पना यांना मदत केली. परंतु शांताबाई मुलीच्या संसाराचा भाग होत आधारवड झाल्या. त्यांनी आपल्या नातवाला घेऊन दुसरे भाजीपाल्याचे दुकान सुरु केले. एका चौकात मुुलगी तर दुसºया चौकात आजी आणि नातू भाजीपाल्याचे दुकान लावतात. नातवाने दहावीची परीक्षा दिली आहे. परंतु त्याच्या पुढील शिक्षणासाठी आणि कुटुंबाच्या उदरभरणासाठीच हा संघर्ष चालला असल्याची भावना त्या आजीने सहज बोलताना व्यक्त केली.

टॅग्स :nagpurनागपूर