शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

लक्ष्मीनगरमध्ये नागपूर दुर्गा महोत्सवाचे भव्य आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 01:25 IST

मध्य भारतात दुर्गा उत्सवाचे भव्यदिव्य आयोजन लक्ष्मीनगर येथे राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळातर्फे करण्यात येणार आहे. या आयोजनाला लोकमतचेही सहकार्य लाभले आहे.

ठळक मुद्देलोकमत व राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळाचे आयोजन : धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: मध्य भारतात दुर्गा उत्सवाचे भव्यदिव्य आयोजन लक्ष्मीनगर येथे राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळातर्फे करण्यात येणार आहे. या आयोजनाला लोकमतचेही सहकार्य लाभले आहे. या महोत्सवात धार्मिक, सांस्कृतिक व बौद्धिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. विशेष आकर्षण म्हणजे महोत्सवाच्या स्थळी लायटिंगद्वारे आयफेल टॉवरची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे.राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळाचे हे बारावे वर्ष आहे. मंडळाद्वारे दरवर्षी लक्ष्मीनगरमध्ये भव्य आयोजन करण्यात येते. या उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक कार्यही मंडळाद्वारे करण्यात येते. यावर्षी मंडळाने भव्यदिव्य आयोजनाचा निर्णय घेतला आहे. मंडळाद्वारे साकारण्यात येणाºया दुर्गेच्या मूर्तीची निर्मिती गंगा नदीच्या मातीतून करण्यात येणार आहे. मूर्ती बनविणारे कलावंत खास कोलकाता येथून बोलाविण्यात आले आहे. आयोजन स्थळावर ‘माझी मेट्रो’ या संकल्पनेवर स्वयंचलित मेट्रोची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. येणाºया भाविकांना भविष्यात शहरात धावणाºया मेट्रोचे फिल येथे अनुभवायला मिळणार आहे. त्याचबरोबर क्रांतिकारी भगतसिंग यांच्या जीवनावरील दुर्मिळ छायाचित्रांची प्रदर्शनी आयोजनस्थळी लावण्यात येणार आहे. याचबरोबर दुर्गा उत्सवाचे नऊ दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा होणार आहे. घटस्थापना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी खासदार विजय दर्डा यांच्या उपस्थितीत होणार आहे. २३ सप्टेंबरला नृत्यस्वरूप संत ज्ञानेश्वर यांच्यावर सोनिया परचुरे व त्यांची चमू नृत्यनाटिका सादर करणार आहे. २४ सप्टेंबरला सावनी रवींद्र यांचा लाईव्ह कॉन्सर्ट होणार आहे. २५ सप्टेंबरला विजय रमण यांच्या विशेष मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. २७ सप्टेंबरला राहुल सोलापूरकर यांचे प्रतापसूर्य बाजीराव यांच्यावर विशेष प्रबोधन होणार आहे. तर २८ सप्टेंबरला अनुप जलोटा यांची भजनसंध्या आयोजित केली आहे. मंडळातर्फे दरवर्षी सामाजिक कार्यसुद्धा करण्यात येते. वृद्धाश्रम, अनाथालय यांना मदत करण्यात येते. मनपाच्या २५ शाळा मंडळातर्फे डिजिटल करण्यात आल्या आहे. पोलीस विभागाला १७०० तर रेल्वेत खलासी काम करणाºया कर्मचाºयांना १५० रेनकोटचे वितरण करण्यात आले आहे.धार्मिक, सांस्कृतिक व बौद्धिक संगम साधण्याचा प्रयत्नदुर्गेचा उत्सव धार्मिक असला तरी या महोत्सवात आम्ही धार्मिक, सांस्कृतिक व बौद्धिक संगम साधण्याचा प्रयत्न केला आहे. देशभक्तीची भावना निर्माण करणारे कार्यक्रम येथे आयोजित करण्यात आले आहेत. समाजात एकोपा निर्माण व्हावा, हा मंडळाचा उद्देश आहे. या माध्यमातून एक सामाजिक चळवळ निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.- प्रसन्न मोहिले,संस्थापक अध्यक्ष, राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळ