शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ग्राम पंचायत सदस्याला एक लाख रुपये दंड

By admin | Updated: May 11, 2017 02:53 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती झेड. ए. हक यांनी दिशाभूल करणारी माहिती देणाऱ्या

हायकोर्ट : दिशाभूल करणारी माहिती दिली लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती झेड. ए. हक यांनी दिशाभूल करणारी माहिती देणाऱ्या ग्राम पंचायत सदस्याला १ लाख ५ हजार रुपये दंड ठोठावला आहे. या आदेशामुळे न्यायालयात खोटे दावे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या भिसी ग्राम पंचायतचे सदस्य अरविंद रेवतकर यांना न्यायालयाने हा दणका दिला आहे. तीन अपत्ये असल्यामुळे त्यांना अपात्र ठरविण्यात आले होते. याविरुद्ध रेवतकर यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. २२ मार्च २०१६ रोजी न्यायालयाने त्यांच्या बाजूने अंतरिम आदेश दिला होता. परिणामी ते सदस्यपद उपभोगत होते. तिसरे अपत्य आपले नसल्याचा व संबंधित खासगी रुग्णालयामध्ये संबंधित तारखेला आपल्या पत्नीने कोणत्याही अपत्याला जन्म दिला नसल्याचा दावा रेवतकर यांनी केला होता. त्यांनी यासंदर्भात पत्नी छाया यांचे खोटे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दाखल केले होते. यानंतर न्यायालयाने संबंधित रुग्णालयाच्या डॉ. अर्पिता देशमुख यांना नोटीस बजावून उत्तर मागितल्यामुळे रेवतकर यांच्या खोटारडेपणाचा भंडाफोड झाला. छाया रेवतकर या आपल्या रुग्णालयात बाळंतपणासाठी आल्या होत्या व त्यांनी मुलीला जन्म दिला, अशी माहिती डॉ. देशमुख यांनी न्यायालयाला दिली. तसेच, आधीच दोन अपत्ये असताना तिसऱ्या अपत्याला जन्म देत असल्याचे बयान रेवतकर दाम्पत्याने त्यावेळी लिहून दिले होते असेही त्यांनी सांगितले. परिणामी न्यायालयाने याचिकाकर्त्याला फटकारून १ लाख ५ हजार रुपये दंड ठोठावला. अशी आहे दंडाची विभागणी न्यायालयाच्या आदेशानुसार रेवतकर यांना भिसी ग्राम पंचायतीमध्ये ५० हजार रुपये जमा करायचे आहेत. तसेच, नागपूर विभागाचे उपायुक्त (सामान्य प्रशासन) व चंद्रपूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना प्रत्येकी २५ हजार रुपये तर, डॉ. देशमुख यांना ५ हजार रुपये दावा खर्च द्यायचा आहे. ही रक्कम डिमांड ड्रॉफ्टद्वारे देऊन त्याच्या पावत्या, छायाप्रती व रक्कम दिल्याचे प्रतिज्ञापत्र ३० जूनपर्यंत न्यायालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसे न केल्यास अजामीनपात्र वॉरंट जारी करून १८ जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचा आदेश देण्यात येईल, अशी तंबी रेवतकर यांना देण्यात आली आहे. खटलाच भरायला हवा खोटी माहिती देऊन दिशाभूल केल्यामुळे याचिकाकर्त्यावर खटलाच भरायला हवा, असे मत न्यायालयाने निर्णयात व्यक्त केले. परंतु, याचिकाकर्त्याने याचिका मागे घेतल्यामुळे खटल्याच्या मुद्यावर पुढे विचार करण्यात आला नाही. असे असले तरी न्यायालयाने याचिकाकर्त्यावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. याचिकाकर्त्याने सदस्यपद वाचविण्यासाठी स्वत:च्या मुलीच्या भविष्याचा विचार केला नाही. एवढेच नाही तर, पत्नीलाही खोटे प्रतिज्ञापत्र सादर करायला लावले. याचिकाकर्त्याचे हे वागणे क्षमा करण्यासारखे नाही, असे न्यायालयाने निर्णयात नमूद करून याचिकाकर्त्याला दंड ठोठावला.