शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

Gram Panchayat Elections : शिंदे गट रामटेकचा गड सर करणार?

By जितेंद्र ढवळे | Updated: November 11, 2022 18:24 IST

ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगूल वाजल्यानंतर गावागावांत राजकीय मोर्चेबांधणीला वेग

रामटेक (नागपूर) : राज्यातील सत्तापरिवर्तनात रामटेकचे आ. आशिष जयस्वाल यांनी शिंदे गटाला साथ दिली. आता रामटेक मतदारसंघात होऊ घातलेल्या रामटेक तालुक्यातील ८ आणि पारशिवनी तालुक्यातील २२ ग्रा.पं.च्या निवडणुकीत मतदार बाळासाहेबांच्या शिवसेनेला साथ देतील का? याकडे राजकीय पोलपंडितांचे लक्ष लागले आहे. 

ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगूल वाजल्यानंतर गावागावांत राजकीय मोर्चेबांधणीला वेग आला आहे. रामटेक, पारशिवनीत शिंदे गटाचे पानिपत करण्यासाठी कॉंग्रेसला ताकद लावावी लागणार आहे. याशिवाय भाजपला अस्तित्व टिकविण्यासाठी नव्या दमाने संघर्ष करावा लागणार आहे.  रामटेक पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडणुकीत काँग्रेसकडे बहुमत असतानाही शिंदे गटाने हात मारला.

जिल्हा परिषद अध्यक्ष व सभापती निवडणुकीत आदिवासी समाजाच्या शांता कुमरे यांना काँग्रेसने डावलले. याचा फटका ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसला बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  रामटेक तालुक्याचे राजकीय भवितव्य ठरविणाऱ्या ज्या मोठ्या ग्रामपंचायत आहेत, यात मनसर, नगरधन, मुसेवाडीचा समावेश आहे. आसोली, भिलेवाडा, आजनी पटगोवारी, हिवराहिवरी या छोट्या ग्रामपंचायती आहेत. गत निवडणुकीत मनसर व भिलेवाडा शिवसेनेकडे होत्या. नगरधन, मुसेवाडी, पटगोवारी, आसोली ग्रामपंचायत कॉंग्रेसच्या ताब्यात होती.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतPoliticsराजकारणramtek-acरामटेकShiv Senaशिवसेना