शहरं
Join us  
Trending Stories
1
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
2
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
3
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
4
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
5
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
6
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
7
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
8
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
9
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
10
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
11
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
12
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
13
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
14
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
15
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
16
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
17
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
18
इराणमध्ये मोठे राजकीय फेरबदल; 'सुप्रीम लीडर'ने कट्टरपंथी विरोधी नेत्याला दिली मोठी जबाबदारी
19
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
20
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...

ग्रामपंचायत निवडणूक : ११८१ जागांसाठी २७९८ उमेदवार निवडणूक रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 00:09 IST

Gram Panchayat Election नागपूर जिल्ह्यात १३० ग्रामपंचायतींपैकी कळमेश्वर तालुक्यातील सोनपूर (आदासा) आणि सावनेर तालुक्यातील जटामखोरा ग्रा.पं.ची निवडणूक अविरोध झाली आहे. आता जिल्ह्यातील १२८ ग्रा.पं.च्या ११८१  जागांसाठी २७९८ उमेदवार रिंगणात आहेत. येथे १५ जानेवारीला निवडणूक होईल.

ठळक मुद्देसोनपूर (अदासा), जटामखोरा अविरोध : १२८ ग्रा.पं.मध्ये १५ जानेवारीला मतदान

लोकमत  न्यूज  नेटवर्क 

नागपूर : नागपूर जिल्ह्यात १३० ग्रामपंचायतींपैकी कळमेश्वर तालुक्यातील सोनपूर (आदासा) आणि सावनेर तालुक्यातील जटामखोरा ग्रा.पं.ची निवडणूक अविरोध झाली आहे. आता जिल्ह्यातील १२८ ग्रा.पं.च्या ११८१  जागांसाठी २७९८ उमेदवार रिंगणात आहेत. येथे १५ जानेवारीला निवडणूक होईल. १८ जानेवारीला मतमोजणी होईल.निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार, सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानुसार जिल्ह्यात विविध ग्रा.पं.साठी इच्छुक असलेल्या ३२२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता २७९८ उमेदवार रिंगणात आहेत. ३१ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जांच्या छाननीअंती ३१२० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. कळमेश्वर तालुक्यातील सोनपूर (अदासा) ग्रा.पं.च्या ७ जागांसाठी सातच अर्ज आल्याने ही ग्रा.पं.आधीच अविरोध झाली होती. दरम्यान, सोमवारी सावनेर तालुक्यातील जटामखोरा ग्रा.पं.ची निवडणूक अविरोध झाली. येथे ७ जागांसाठी ९ उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. यातील दोघांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने येथील निवडणूकही अविरोध झाली आहे. जिल्ह्यातील तेराही तालुक्यांत सोमवारी दुपारनंतर निवडणूक चिन्ह वाटपाची प्रक्रिया झाली. त्यामुळे आता गावागावांतील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. मंगळवार (दि. ५) पासून गावागावांत राजकीय फड रंगणार आहेत. १३ जानेवारी रोजी प्रचारतोफा थंडावतील. नागपूर जिल्ह्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असाच सामना रंगणार आहे. मात्र, काही ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना समर्थकांनी वेगवेगळी चूल मांडली आहे. त्यामुळे येथील राजकीय पारा चढला आहे. यात कामठी, कुही आणि नागपूर (ग्रामीण) मधील काही ग्रा.पं.चा समावेश आहे. त्यामुळे काही गावांत दुरंगी, तर काही गावांत चौरंगी लढत होईल.

दवलामेटी, सातगाव वेणानगर येथे सर्वाधिक उमेदवारनागपूर ग्रामीण तालुक्यातील दवलामेटी ग्रा.पं.च्या १७ जागांसाठी ७८ उमेदवार रिंगणात आहेत. यासोबतच हिंगणा तालुक्यातील सातगाव वेणानगर येथील १५ जागांसाठी ५० उमेदवार रिंगणात आहेत. तसेच कामठी तालुक्यातील कोराडी येथे १७ जागांसाठी ४३ उमदेवार आपले नशीब आजमावणार आहेत.

कोराडी, पाटणसावंगीकडे जिल्ह्याचे लक्षनागपूर जिल्ह्यात निवडणूक होऊ घातलेल्या १२८ ही ग्रा.पं.मध्ये रंगतदार लढती होणार आहेत. मात्र, कामठी तालुक्यातील कोराडी आणि सावनेर तालुक्यातील पाटणसावंगी ग्रा.पं.च्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. कोराडी हे भाजपचे प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, तर पाटणसावंगी हे राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांचे होमटाऊन आहे. कोराडीत कॉँग्रेस समर्थित पॅनल आणि भाजप समर्थित पॅनल अशी दुहेरी लढत होईल. मात्र, येथे राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्याने याचा फटका कोणाला बसतो, याकडे लक्ष लागले आहे. येथे काही वाॅर्डात अपक्षांनीही दंड थोपटले आहेत. कोराडीत काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुरेश भोयर आणि जि.प.सदस्य नाना कंभाले यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पाटणसावंगी ग्रा.पं.मध्ये काँग्रेस समर्थित पॅनल आणि भाजप समर्थित पॅनेलमध्ये थेट लढत होणार आहे. या १७ सदस्यीय ग्रा.पं.मध्ये वॉर्ड क्रमांक ६ मध्ये निवडणूक अविरोध झाली आहे. त्यामुळे येथे उर्वरित ५ वॉर्डातील १४ जागांसाठी निवडणूक होईल. येथे काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल राय यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक