शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

वृद्धाश्रमांना बीपीएलच्या दरानुसार धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 01:57 IST

वृद्धाश्रमांना बीपीएलच्या दराप्रमाणे शासकीय रेशन दुकानातून धान्य देण्याबाबतचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. याअंतर्गत वृद्धाश्रमांना दोन आणि तीन रुपये किलोप्रमाणे धान्य मिळेल. राज्य सरकारने याबाबत केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला आहे. केंद्रानेही सकारत्मक भूमिका घेतली आहे.

ठळक मुद्देगिरीश बापट : राज्य सरकारने केंद्राला पाठविला प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वृद्धाश्रमांना बीपीएलच्या दराप्रमाणे शासकीय रेशन दुकानातून धान्य देण्याबाबतचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. याअंतर्गत वृद्धाश्रमांना दोन आणि तीन रुपये किलोप्रमाणे धान्य मिळेल. राज्य सरकारने याबाबत केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला आहे. केंद्रानेही सकारत्मक भूमिका घेतली आहे.अन्न पुरवठा व संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी याबाबतची माहिती मंगळवारी विधानसभेत दिली.अमित साटप, बच्चू कडू, अनिल बोंडे आदींनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते. वरिष्ठ नागरिकांबाबत देण्यात आलेल्या आश्वासनांची योग्य अंमलबजावणी झाली नसल्याची बाब बापट यांनी मान्य केली. सरकार राज्यातील एक कोटी ३० लाख ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांबाबत गंभीर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित लक्षवेधी सूचनेवर समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले यांनी उत्तर दिले. आपल्या उत्तरात त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनातर्फे करण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली. परंतु या उत्तराने सदस्यांचे समाधान झाले नाही. शेवटी संसदीय कामकाज मंत्री बापट यांनी मध्यस्थी करीत यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्याची माहिती दिली. सर्व पक्षांच्या गटनेत्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत योजनांवर विचार केला जाईल, असे सांगितले.ज्येष्ठ नागरिकांचे वय ६० व्हावेलक्षवेधी सूचनेवर बोलताना सदस्यांनी एका स्वरात म्हटले की, ६० वर्षांवरील नागरिकांना ज्येष्ठ मानले जावे. केंद्राने ६० वर्षांवरील व्यक्ती ज्येष्ठ नागरिक ठरविले आहे. अनेक राज्यांतही ६० वर्षच वयोमान आहे. परंतु महाराष्ट्रातच ज्येष्ठ नागरिकांचे वय ६५ वर्षे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही ज्येष्ठ नागरिकांचे वय ६० वर्षे व्हावे. यावर राजकुमार बडोले यांनी तसे निर्देश दिल्याचे सांगितले. यावर सदस्य आणखी संतापले. दोन वर्षांपूर्वीही आश्वासन देण्यात आले होते. परंतु काहीही झाले नाही. पुन्हा तीच आश्वासने दिली जात आहेत. अजित पवार यांनी शासनाचा जीआर कुठल्याही कामाचा नसल्याची टीका केली.लक्षवेधी ठेवली राखूनया लक्षेवधी सूचनेवरील उत्तराने सदस्यांचे समाधान झाले नाही. अजित पवार व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता लक्षवेधी राखून ठेवण्याची विनंती केली. यावर संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी स्पष्ट केले की, ज्येष्ठ नागरिकांचा विषय हा सरकार प्रतिष्ठेचा मुद्दा बनवू इच्छित नाही, विरोधी पक्षानेही त्याला प्रतिष्ठेशी जोडू नये. सदस्य उत्तराने समाधानी नसतील तर ही लक्षवेधी राखून ठेवण्यास आम्ही तयार आहोत. यानंतर ही लक्षवेधी राखून ठेवण्यात आली.

 

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८girish bapatगिरीष बापट