मल्टिलेव्हल मार्केटिंगच्या माध्यमातून ४९ लाख हडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:08 AM2021-04-18T04:08:54+5:302021-04-18T04:08:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एका प्रॉपर्टी डीलरकडून मल्टिलेव्हल मार्केटिंगच्या माध्यमातून एका टोळीने वेगवेगळ्या गुंतवणूकदारांचे ४९ लाख रुपये हडपले. ...

Grabbed Rs 49 lakh through multilevel marketing | मल्टिलेव्हल मार्केटिंगच्या माध्यमातून ४९ लाख हडपले

मल्टिलेव्हल मार्केटिंगच्या माध्यमातून ४९ लाख हडपले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : एका प्रॉपर्टी डीलरकडून मल्टिलेव्हल मार्केटिंगच्या माध्यमातून एका टोळीने वेगवेगळ्या गुंतवणूकदारांचे ४९ लाख रुपये हडपले. आठ महिने होऊनही रक्कम परत करण्यास आरोपी तयार नसल्याने त्यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आले. त्यामुळे गुंतवणूकदारांनी यशोधरानगर पोलिसांकडे तक्रार नोंदवली.

नीलेश नरहरी मोहाडीकर (वय ३३) असे या प्रकरणात तक्रार करणाऱ्या प्रॉपर्टी डीलरचे नाव आहे. नीलेशच्या तक्रारीनुसार, आरोपी राजेंद्र खोब्रागडे आणि साक्षी खोब्रागडे हे दोघे जुलै २०२० मध्ये नीलेशच्या कार्यालयात आले होते. त्यावेळी या दोघांनी इथर ट्रेड एशिया नामक ऑनलाइन कंपनीत क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास अल्पावधीतच लाखो रुपयांचा लाभ मिळतो, असे सांगितले. त्यानंतर निषेध महादेव वासनिक, प्रगती निषेध वासनिक, संदेश पंजाब लांजेवार (रा. गोंडगाव, पारशिवणी), गजानन भोलेनाथ मुंगने (नंदनवन), श्रीकांत लक्ष्मणराव वाड आणि अभय श्रीनिवास वाघधरे (रा. वंजारीनगर) या सर्वांनी बनावट वेबसाइट आणि कागदोपत्री कंपनी बनवून त्यात मोठा लाभ मिळत असल्याचा बनाव केला आणि नीलेश यांचे ८ लाख, ६३ हजार तसेच अन्य गुंतवणूकदारांचे मिळून एकूण ४८ लाख, ६३ हजार, ५०० रुपये हडपले. पोलीस चाैकशीत उपरोक्त आरोपींची बनवाबनवी उघड झाल्याने यशोधरानगर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

---

फार्मसीच्या लायसेन्सच्या नावाने फसवणूक

नागपूर : फार्मसीचे लायसेन्स बनवून देण्याची थाप मारून आरोपी अभिजित किरण इंगळे (वय २८, रा. मानेवाडा) याने आकाश अंकुश पाहुणे नामक तरुणाचे एक लाख, ३ हजार रुपये हडपले. २२ जून २०१९ पासून हा व्यवहार झाल्यानंतर आरोपी थापेबाजी करीत असल्याने अखेर पाहुणेने पोलिसांकडे धाव घेतली. त्यामुळे सदर पोलिसांनी अरोपी इंगळेविरुद्ध गुन्हा दाखल केला.

----

Web Title: Grabbed Rs 49 lakh through multilevel marketing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.