शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांच्या हिताचे अर्थकारण शासनाकडून कायम दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 22:15 IST

गरीब-श्रीमंतीची दरी मागील अनेक वर्षांपासून वाढतच आहे. शासन गरिबांच्या हितासाठी अनेक योजना राबविते. परंतु त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचतात की नाही याचा हिशेब नसतो. देशात जाती-पातीचे राजकारण आहे. गरिबांच्या हिताचे अर्थकारण शासनाकडून कायमच दुर्लक्षित केल्या गेले. त्यामुळेच गरिबी वाढतच गेली असा सूर मान्यवर वक्त्यांनी शुक्रवारी झालेल्या चर्चासत्रात काढला.

ठळक मुद्देमान्यवरांचे प्रतिपादन : ‘दारिद्र्याची शोधयात्रा’ अहवालावर चर्चासत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गरीब-श्रीमंतीची दरी मागील अनेक वर्षांपासून वाढतच आहे. शासन गरिबांच्या हितासाठी अनेक योजना राबविते. परंतु त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचतात की नाही याचा हिशेब नसतो. देशात जाती-पातीचे राजकारण आहे. गरिबांच्या हिताचे अर्थकारण शासनाकडून कायमच दुर्लक्षित केल्या गेले. त्यामुळेच गरिबी वाढतच गेली असा सूर मान्यवर वक्त्यांनी शुक्रवारी झालेल्या चर्चासत्रात काढला.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र नागपूर आणि संघर्ष वाहिनीच्या वतीने शंकरनगरातील श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात ‘दारिद्र्याची शोधयात्रा’ या हेरंब कुळकर्णी यांच्या अहवालावर चर्चा करण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ. गिरीश गांधी होते. व्यासपीठावर विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात, शेतकरी नेते विजय जावंधिया, अर्थशास्त्राचे अभ्यासक डॉ. श्रीनिवास खांदेवाले, पत्रकार जयदीप हर्डीकर, प्रदीप विटाळकर उपस्थित होते. डॉ. सुखदेव थोरात म्हणाले, दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र पहिला आहे. परंतु गरिबी निर्मूलनात पिछाडीवर आहे. हेरंब कुळकर्णी यांचे पुस्तक गरिबीचे प्रतिबिंब दाखविते. विदर्भ मागे का आहे हे समजून घेण्याची गरज आहे. त्यांनी महाराष्ट्रातील आदिवासी, दलित आणि मुस्लिमांच्या गरिबीचे सत्य मांडणारी आकडेवारी सांगितली. ते म्हणाले, कोणत्या भागाला किती पैसा दिला हे शासनाने तपासण्याची गरज आहे. जमीन सिंचनाखाली नसल्यामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भ मागासला आहे. महाराष्ट्रात ८० टक्के जमीन उच्च वर्णीयांकडे असून प्रत्येकाला जमीन देण्यासाठी धोरण आखण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. विजय जावंधिया म्हणाले, शहराच्या विकासासाठी खेड्यांचे शोषण सुरू आहे. २०२६ मध्ये आठवा वेतन आयोग येऊन कमीत कमी वेतन ४५ हजार होईल. यात शेतमजुरांना किती रोज मिळेल याची शाश्वती नाही. शेतमालाला हमी भाव देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. श्रीनिवास खांदेवाले म्हणाले, हा देश वंचितांचा नव्हे तर कॉर्पोरेट, डिजिटलवाल्यांचा आहे. गरिबांविषयी बोलताना उद्योजकांना अधिक सूट देण्यात येते. योजना तयार करताना वंचितांच्या अडचणी कोणत्या हे समजून घेतल्या जात नसल्यामुळे गरिबी वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. गिरीश गांधी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. अहवालावर चर्चा होऊन निर्णय प्रक्रियेत असलेल्यांवर दबाव यावा यासाठी दारिद्र्याची शोधयात्रा केल्याचे हेरंब कुळकर्णी म्हणाले. संचालन प्रमोद काळबांडे यांनी केले. चर्चासत्राला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :nagpurनागपूर