शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शासनाचे गोवर रुबेला लसीकरण अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 00:18 IST

महाराष्ट्र शासनातर्फे २७ नोव्हेंबरपासून शाळाशाळांमध्ये गोवर व रुबेला लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत आहे. अशात लसीकरणाचा भार ज्या महिला परिचरांवर आहे, त्यांनी शासनाच्या विरोधात २६ नोव्हेंबरपासून धरणे आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे गोवर रुबेला लसीकरण अभियान अडचणीत येण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देमहिला परिचरांनी दिला आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र शासनातर्फे २७ नोव्हेंबरपासून शाळाशाळांमध्ये गोवर व रुबेला लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत आहे. अशात लसीकरणाचा भार ज्या महिला परिचरांवर आहे, त्यांनी शासनाच्या विरोधात २६ नोव्हेंबरपासून धरणे आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे गोवर रुबेला लसीकरण अभियान अडचणीत येण्याची शक्यता आहे.महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिचरांच्या अनेक मागण्या मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. शासन बैठका घेते. परंतु, त्यानंतर मागण्यांची पूर्तताच होत नाही. त्यामुळे महिला परिचरांनी येत्या २६ नोव्हेंबरपासून मुंबई विधिमंडळावर बेमुदत धरणे आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. अर्धवेळ स्त्री परिचर यांना किमान वेतन ६ हजार मिळावे याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाने आरोग्य विभागाला परत पाठविला आहे. वित्त विभागाने, आरोग्य विभागाकडून प्रस्ताव मागवून मंजुरी द्यावी, अशी मागणी महिला परिचर संघटनेने केली आहे. सत्तेवर आल्यापासून शासन महिला परिचरांची दिशाभूल करीत आहे. शिष्टमंडळाला चर्चेला बोलावून आश्वासन देते. पण, महिला संघटनेचा एकही प्रश्न सोडवत नाही, असा आरोप अर्धवेळ महिला परिचर संघटनेच्या अध्यक्षा मंगला मेश्राम यांनी केला आहे. संघटनेचे सर्व प्रश्न व मागण्यांना घेऊन सरकारला धारेवर धरण्यासाठी संघटनेने पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. संघटनेच्या सर्व जिल्ह्यांतील अध्यक्ष, सचिव व सर्व महिला कोणताही गोवर रुबेला मोहिमेत सहभागी न होता आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन मंगला मेश्राम, सचिव मंजुला बांगर, रुख्मिणी पैठणे आदींनी केले आहे. या आहेत मागण्या

  • किमान वेतनासह नियमित वेतन मिळावे
  • गणवेशासह ओळखपत्र, प्रवासभत्ता मिळावा
  • सरकारी नियम लागू करावे
  • राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी करावे
  • अतिरिक्त कामाचा मोबदला मिळावा
टॅग्स :government schemeसरकारी योजनाHealthआरोग्य