शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

न्यायालयाच्या नवनवीन आदेशांमुळे सरकारची कोंडी

By admin | Updated: April 9, 2017 02:21 IST

वैद्यकीय प्रवेशाबाबत न्यायालयांचे वेगवेगळे आदेश येत आहेत. त्यामुळे एक ठोस निर्णय घेणे सरकारला अडचणीचे जाते.

नितीन गडकरी : डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांचा सत्कार नागपूर : वैद्यकीय प्रवेशाबाबत न्यायालयांचे वेगवेगळे आदेश येत आहेत. त्यामुळे एक ठोस निर्णय घेणे सरकारला अडचणीचे जाते. न्यायालयाच्या कार्यक्षेत्राबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे कारण नाही. परंतु मागच्या काही दिवसांपासून न्यायालयाच्या नवनवीन आदेशांमुळे सरकारच्या कार्यपद्धतीत व्यत्यय निर्माण होतोय, अशी खंत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. शनिवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात ते बोलत होते. वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी कृष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स, कराडचे कुलपती आणि दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था, वर्धाचे उपकुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांना राष्ट्रपतींच्या हस्ते नुकताच डॉ. बी.सी. रॉय पुरस्कार प्रदान करण्यात आला. यानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील त्यांचा मित्रपरिवार, सहकारी आणि हितचिंतकाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व्ही. एस. सिरपूरकर, प्रमुख अतिथी म्हणून लोकमत एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार एस. एन. विनोद, आ. प्रकाश गजभिये, कार्यक्रमाचे संयोजक डॉ. गिरीश गांधी, नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव पुरण मेश्राम, अ‍ॅड. अभिजित वंजारी यांच्यासह डॉ. डी. के. अग्रवाल, डॉ. वीणा प्रकाशे व डॉ. मिलिंद नाईक उपस्थित होते. गडकरी पुढे म्हणाले, डॉ. मिश्रा यांचे वैद्यकीय क्षेत्रातील योगदान देश लक्षात ठेवेल असे आहे. गुणवत्तेने व्यक्ती कशी मोठी होते त्यांनी सिद्ध केले आहे. मी जहाजराणी मंत्री असल्याने पोर्टमध्ये हॉस्पिटल्स उभारण्याबाबत डॉ. मिश्रा यांची मदत घेतली तेव्हा त्यांचा या क्षेत्रातील अभ्यास पाहून माझ्या विभागाचे सचिवही थक्क झाले. असा प्रतिभावंत माणूस आपल्या शहरातील आहे, याचा अभिमान वाटतो, असे गौरवोद्गाही गडकरींनी काढले. विजय दर्डा म्हणाले, हे सभागृह भरणे मोठी आव्हानात्मक गोष्ट असते. परंतु आज येथे पाय ठेवायलाही जागा नाही, हीच डॉ. मिश्रा यांच्या कार्याची पावती आहे. त्यांनी लिंगभेदावर कॅनडात जो अ‍ॅक्शन प्लान सादर केला त्यावर आता भारत सरकार कायदा बनवित आहे, ही मोठीच गोष्ट आहे. त्यांनी नागपूरच नाही तर देशाचा गौरव वाढवला आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या आई आज हा सत्कार बघायला या जगात राहिल्या नाहीत. पण, या शहराने आईच्या मायेनेच डॉ. मिश्रा यांचा हा भव्य सत्कार घडवून आणला आहे, असे प्रतिपादन या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व्ही. एस. सिरपूरकर यांनी केले. यावेळी ज्येष्ठ संपादक एस. एन. विनोद यांनीही आपले विचार व्यक्त केले. डॉ. मिश्रा यांनी सत्काराला उत्तर देताना अतिशय भावुक भाषण केले. ते म्हणाले, या पुरस्काराने माझी जबाबदारी वाढवली आहे. माजी खासदार गेव्ह आवारी यांनी मला राजकाणात येण्याचा सल्ला दिला होता. पण, मी माझे आयुष्य वैद्यकीय सेवेत घालविण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयाचा हा सत्कार आहे याचा मला विशेष आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गिरीश गांधी यांनी केले. संचालन रेणुका देशकर तर आभार डॉ. डी. के. अग्रवाल यांनी मानले. यावेळी डॉ. मिश्रा यांचे बंधू ब्रिगेडिअर प्रमोद मिश्रा यांनी आपल्या मोठ्या भावावर एक कविता सादर केली. (प्रतिनिधी) नागपूर विद्यापीठातील जातीचे राजकारण दुर्भाग्यपूर्ण मागच्या काही दिवसात नागपूर विद्यापीठात जे काही जातीचे राजकारण घडले ते घडायला नको होते. विद्यापीठातील राजकारणाने तर जणू देशाच्या राजकारणावरही मात केल्याचे जाणवत आहे. विद्यापीठ हे शिक्षणाचेच केंद्र असले पाहिजे ते राजकारणाचा आखाडा बनू नये, असे सूचक विधान नितीन गडकरी यांनी केले. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला विद्यापीठाशी संबधित अनेक अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. नितीन...मराठीत बोल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाषणाला डायसवर येताच प्रेक्षकातून एका ज्येष्ठ व्यक्तीचा आवाज आला. नितीन...आज तू मराठीतच बोल, असे आज्ञावजा आवाहन त्या ज्येष्ठ व्यक्तीने केले. गडकरींना एकेरीत आवाज देणारी ही व्यक्ती कोण अशी कुजबूज सुरू असताना ते डॉ. मिश्रा यांचे वडील गंगाप्रसाद मिश्रा असल्याचे कळले आणि गडकरींनीही त्यांचा आदेश शिरसावंद्य मानून मराठीत भाषण केले.