शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून 'सरकार' नागपुरात : हिवाळी अधिवेशन उद्यापासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 00:25 IST

हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासूनच सुरुवात होणार असली तरी संपूर्ण सरकार रविवारीच शहरात येणार आहे. महाविकास आघाडीचे हे पहिलेच अधिवेशन ठरणार असल्याने सरकारतर्फे तयारी करण्यात आली आहे तर विरोधक सरकारची कोंडी करण्यासाठी आक्रमक पवित्र्यात आहेत.

ठळक मुद्देविरोधक आक्रमक पवित्र्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासूनच सुरुवात होणार असली तरी संपूर्ण सरकार रविवारीच शहरात येणार आहे. महाविकास आघाडीचे हे पहिलेच अधिवेशन ठरणार असल्याने सरकारतर्फे तयारी करण्यात आली आहे तर विरोधक सरकारची कोंडी करण्यासाठी आक्रमक पवित्र्यात आहेत. रविवारी शहरात विरोधकांची बैठक होणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील अधिवेशनात सरकारची भूमिका काय असेल हे स्पष्ट करणार आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दुपारी २ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होणार आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेतर्फे त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. सायंकाळी ५ वाजता ‘रामगिरी’ येथे चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर लगेच ते पत्रपरिषदेला संबोधित करतील. अधिवेशनात पुरवणी मागण्या मंजूर करण्यावर सरकारचा जोर राहणार आहे.तर दुसरीकडे विरोधकांची सकाळी ११ वाजता रविभवन येथील कॉटेज क्रमांक ३ येथे बैठक होणार आहे. या बैठकीत चहापानात सहभागी होण्याबाबत अंतिम निर्णय होईल. या बैठकीला विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे उपस्थित राहतील. सरकारची कोंडी करण्यासंदर्भातील मुद्द्यांवरदेखील यात चर्चा होईल.अधिवेशन ठरणार वादळीया अधिवेशनाचा कालावधी कमी असला तरी हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे वक्तव्य तसेच नागरिकत्व संशोधन विधेयकावरुन भाजप आक्रमक पवित्रा घेणार आहे. याशिवाय शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी अतिवृष्टी, विकास कामांवरील स्थगिती या मुद्द्यांवरुनदेखील सरकारला घेरण्यात येईल.प्रश्नोत्तरे नाहीच, लक्षवेधीवर भरविधिमंडळ अधिवेशनाचे कामकाज शनिवारपर्यंत निश्चित झाले आहे. त्यामुळे एकच आठवड्याचे अधिवेशन ठरेल, असे अंदाज लावले जात आहेत. सत्तास्थापना उशिरा झाल्याने यंदा अधिवेशनात प्रश्नोत्तरे राहणार नाहीत. त्यामुळे आमदारांचा भर लक्षवेधी सूचनांवर राहणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विधीमंडळ सचिवालयाला एक हजारांहून अधिक प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.अधिवेशनाच्या कालावधीवरुन नाराजीमहाविकासआघाडी शासनाचे पहिलेच अधिवेशन विदर्भात होत असल्याने या भागाला न्याय देण्यासाठी जास्त दिवस अधिवेशन घ्यावे, अशी मागणी होती. परंतु प्रत्यक्षात केवळ सहाच दिवस अधिवेशन चालण्याची दाट शक्यता असल्यामुळे विदर्भातील आमदारांसह विविध संघटना व नागरिकांमध्येदेखील नाराजीचा सूर आहे. यावरुनदेखील सरकारला घेरण्याचा प्रयत्न होऊ शकतो.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनnagpurनागपूर