शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने एलबीटी कायदा पूर्णपणे रद्द करावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 20:38 IST

एलबीटी कायदेशीर प्रक्रिया पूर्णत: रद्द करून व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी नाग विदर्भ चेंबरऑफ कॉमर्सचे (एनव्हीसीसी) अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी येथे केली.

ठळक मुद्देएनव्हीसीसीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी : विभागातर्फे अव्यावहारिक डिमांड नोटीस

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : एलबीटी कर कायदेशीररीत्या रद्द झाल्यानंतरही त्याची भीती व्यापाऱ्यांना आजही सतावत आहे. एलबीटी विभागाद्वारे असेसमेंटच्या नावाखाली व्यापाऱ्यांना त्रास देण्यात येत आहे. विभागातर्फे बेस्ट जजमेंट आणि पेनॉल्टीच्या नावावर अव्यावहारिक डिमांड नोटीस पाठविण्यात येत आहे. एलबीटी कायदेशीर प्रक्रिया पूर्णत: रद्द करून व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी नाग विदर्भ चेंबरऑफ कॉमर्सचे (एनव्हीसीसी) अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी येथे केली.एनव्हीसीच्या सभागृहात चर्चेदरम्यान मेहाडिया बोलत होते. यावेळी माजी अध्यक्ष प्रकाश मेहाडिया, उपाध्यक्ष अर्जुनदास आहुजा, फारुखभाई अकबानी, संजय के. अग्रवाल, सचिव रामअवतार तोतला, सहसचिव शब्बार शाकीर, राजू माखिजा उपस्थित होते.अश्विन मेहाडिया म्हणाले, राज्यातील सरकार शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे हित जोपासत आहे. जुलै २०१६ मध्ये राज्य शासनाने जीवनाश्यक वस्तूंना सर्व प्रकारच्या करातून मुक्त केले होते. पण या वस्तूंवर राज्याच्या एपीएमसी बाजारात सेस वसूल करण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांनी एपीएमसीमध्ये जाणे कमी केले आहे. सरकारने एपीएमसी बाजारातून सेस हटविल्यास व्यापाऱ्यांची एपीएमसीमध्ये खरेदीची इच्छा वाढेल आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात महाराष्ट्र राज्य आर्थिक समृद्धीने परिपूर्ण होईल तसेच पूर्णत: भयमुक्त आणि सुरक्षित राहील, असे मेहाडिया यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :businessव्यवसायTaxकरChief Ministerमुख्यमंत्री