शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने शेतकऱ्यांप्रती संवेदनशील व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 20:09 IST

निसर्गाची साथ न मिळाल्यामुळे शेतीत हवे तसे उत्पादन होत नाही. उत्पादन झाले तरी योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्येचा निर्णय घेतो. त्यामुळे शेतकऱ्यांना या आत्महत्येच्या सत्रातून बाहेर काढण्यासाठी शासनाने संवेदनशील होऊन शेतकऱ्यांसाठी उपाययोजना करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले.

ठळक मुद्देजनमंचतर्फे अन्नदात्यासाठी सहवेदना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निसर्गाची साथ न मिळाल्यामुळे शेतीत हवे तसे उत्पादन होत नाही. उत्पादन झाले तरी योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्येचा निर्णय घेतो. त्यामुळे शेतकऱ्यांना या आत्महत्येच्या सत्रातून बाहेर काढण्यासाठी शासनाने संवेदनशील होऊन शेतकऱ्यांसाठी उपाययोजना करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले.यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यातील चिलगव्हाण येथील साहेबराव पाटील करपे यांनी पत्नी व चार मुलांसह वर्धा, दत्तपूर येथील मनोहर कुष्ठधामात आत्महत्या केली होती. १९ मार्चला या घटनेला ३३ वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे जनमंचने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांविषयी सहवेदना व्यक्त करण्यासाठी महाराजबाग चौकातील डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ््याजवळ अन्नदात्यासाठी सहवेदना या धरणे, विचारमंथन कार्यक्रमाचे आयोजन केले. जनमंचचे अध्यक्ष प्रमोद पांडे म्हणाले, शेतकऱ्यांचे प्रश्न अनेक वर्षांपासून जैसे थे आहेत. आत्महत्या कमी झालेल्या नाहीत. शेतमालाला भाव मिळत नाही. त्यामुळे शासनाने शेतकरी आत्मसन्मान योजनेची रक्कम वाढवून दिलासा देण्याची गरज आहे. जनमंच सिंचन शोध यात्रेला यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. अमिताभ पावडे म्हणाले, भरघोस उत्पादन झाल्यामुळे भाव घटून उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. तो कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतो. त्यामुळे ही व्यवस्था बदलण्याची गरज आहे. रमेश बोरकुटे म्हणाले, देशात कोट्यवधी रुपये बुडवून उद्योगपती पळून जातात. परंतु शेतात राबूनही शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागते. शासनाने त्यांना १० हजार पेन्शन देण्याची गरज आहे. सुधीर पालीवाल यांनी ग्लोबल वार्मिंगचा पर्यावरण, शेतीवर परिणाम होत असून जनमंचने याबाबत पुढाकार घेण्याचे आवाहन केले. रामभाऊ आखरे,चंद्रकांत विरखरे यांनी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून शासनाने उपाययोजना करण्याची मागणी केली. जनमंचचे सहसचिव अ‍ॅड. मनोहर रडके यांनी सामूहिक शेती केल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे सांगितले. दादा झोडे यांनी शेतीला दर्जा मिळवून देण्यासाठी शेतमालाला भाव, रोजंदारीची समस्या यातील असमतोल दूर करण्याची मागणी केली. प्रास्ताविकातून नरेश क्षीरसागर यांनी शेतकऱ्यांना आत्मबल देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. संचालन श्रीकांत दोड यांनी केले. यावेळी जनमंचचे सल्लागार प्रा. शरद पाटील, राजीव जगताप, टी. बी. जगताप, विनोद बोरकुटे, गणेश खर्चे, प्रल्हाद खरसने, विट्ठल जावळकर, लक्ष्मण सावळकर, प्रभाकर खोंडे, मुन्ना महाजन उपस्थित होते.

 

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार