शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
3
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
4
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
5
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
6
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
7
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
8
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
9
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
10
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
11
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
12
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
13
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
14
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
15
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
16
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
17
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
18
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
19
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
20
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी

सरकारची नोटीस, कर्मचारी संपावर ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 22:15 IST

कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय संपामुळे नागपूर जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही शासकीय कामकाज ठप्प पडले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासह इतर शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग नोंदविल्याने दैनंदिन कामे खोळंबली. यामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली. दुसऱ्या दिवशी शिक्षक व आरोग्य कर्मचाऱ्यांनीही ताकतीनिशी संपात सहभाग घेतल्यामुळे जिल्ह्यातील शेकडो शाळा-ग्रामीण रुग्णालये बंद होते. दरम्यान काम खोळंबत असल्याने कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस नागपूर जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खंजांजी यांनी संपावर असलेल्या महसूल कर्मचाऱ्यांना बजावली आहे. परंतु कर्मचारी मात्र संपावर ठाम आहेत.

ठळक मुद्देदुसऱ्या दिवशीही कामकाज ठप्प : शाळा-ग्रामीण रुग्णालये बंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय संपामुळे नागपूर जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही शासकीय कामकाज ठप्प पडले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासह इतर शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग नोंदविल्याने दैनंदिन कामे खोळंबली. यामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली. दुसऱ्या दिवशी शिक्षक व आरोग्य कर्मचाऱ्यांनीही ताकतीनिशी संपात सहभाग घेतल्यामुळे जिल्ह्यातील शेकडो शाळा-ग्रामीण रुग्णालये बंद होते. दरम्यान काम खोळंबत असल्याने कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस नागपूर जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खंजांजी यांनी संपावर असलेल्या महसूल कर्मचाऱ्यांना बजावली आहे. परंतु कर्मचारी मात्र संपावर ठाम आहेत.सातवा वेतन आयोग त्वरित लागू करावा, अंशदाई पेन्शन योजना रद्द करून जुनीच पेन्शन योजना लागू करावी, पाच दिवसांचा आठवडा करण्यात यावा, खासगीकरण, कंत्राटीकरण धोरण रद्द करा, सेवानिवृत्ती वय ६० वर्षे करा आदी प्रमुख मागण्यांसाठी हा संप सुरू आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी जिल्ह्यात संपाला चांगला प्रतिसाद मिळाला. नागपूर शहर व ग्रामीण भागातील बहुतांश शासकीय कार्यालये कर्मचाऱ्यांविना ओस पडली होती. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, विभागीय आयुक्त कार्यालय इमारतीतील कार्यालये आदी कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. यामुळे शासनाचा कोट्यवधीचा महसूलही बुडाला. संविधान चौकात संपकरी कर्मचाऱ्यांनी दुसऱ्याही दिवशी शक्तीप्रदर्शन करून, सरकारवर दबाव बनविण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण शासकीय यंत्रणा दुसऱ्याही दिवशी रस्त्यावर उतरली होती. त्याचा फटका मात्र, सामान्यांना बसला. शासकीय कामकाजासाठी सरकारी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना कर्मचाऱ्यांअभावी रिकाम्या हाताने परतावे लागले.कर्मचाऱ्यांनी दैनंदिन कामकाजात सहभाग घेतला नाही. त्यामुळे शासकीय कामकाज प्रभावित झाले. महसूल विभागातील कर्मचारी संपावर असल्याने नागरिकांना महत्त्वाचे दाखले मिळू शकले नाही. शिक्षकांच्या सहभागामुळे शाळाही बंद होत्या. ज्या शिक्षक संघटनांनी संपाला पाठिंबा दिला, त्यांनी काळ्या फिती लावून अध्यापनाचे कार्य केले. ग्रामीण आरोग्य यंत्रणेतील नर्सेस, फार्मासिस्ट, शिपाई, शासकीय वाहनावरील चालक, लिपीक संपात सहभागी झाल्याने त्याचा फटका रुग्ण व्यवस्थेला बसला.कामे खोळंबली, नोटीस बजावलीसंपामुळे शासकीय कामावर परिणाम पडला आहे. कामे खोळंबली आहेत. त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर हजर होण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. कामावर हजर न झाल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशाराही या नोटीसद्वारे देण्यात आला आहे.रवींद्र खजांजीनिवासी उपजिल्हाधिकारीसंप कायम राहणारसंपामुळे शासनाची गैरसोय होत आहे. त्यामुळेच नोटीस बजावण्यास आली आहे. परंतु आमचा संप सुरूच आहे. यासंदर्भात आमचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील. त्यांचे आदेश येत नाहीत, तोपर्यंत आमचा संप सुरू राहील.देवेंद्र शिंदोडकर : अध्यक्षनागपूर जिल्हा तृतीय श्रेणी महसूल कर्मचारी संघटना

 

टॅग्स :StrikeसंपEmployeeकर्मचारी