शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सरकार मायबापहो निवृत्त कर्मचाऱ्यांना न्याय द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 20:37 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही आणि संसदेच्या दोन्ही सभागृहात तो आदेश कायदा म्हणून पारित केल्यानंतरही सरकारकडून निवृत्त कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या पेनशनबाबत अद्यापही कारवाई न करता केंद्रातर्फे त्या विरुद्ध पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आलेली आहे. ही याचिका परत घेऊन सरकारने कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी निवृत्त कर्मचारी (१९९५) समन्वय समितीने केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही आणि संसदेच्या दोन्ही सभागृहात तो आदेश कायदा म्हणून पारित केल्यानंतरही सरकारकडून निवृत्त कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या पेनशनबाबत अद्यापही कारवाई न करता केंद्रातर्फे त्या विरुद्ध पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आलेली आहे. ही याचिका परत घेऊन सरकारने कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी निवृत्त कर्मचारी (१९९५) समन्वय समितीने केली आहे.या मागणीचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आले आहे. ही याचिका ६७ लाख निवृत्त पेन्शनर्स आणि १७.२ कोटी कार्यरत कर्मचाऱ्यांना या पेन्शन योजनेत समाविष्ट करण्यासंदर्भात आहे. सर्वोच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा मार्ग मोकळा केल्यानंतर सरकारने संसदेच्या दोन्ही सभागृहातून हा निर्णय पारित करवून घेतला आणि २३ मार्च २०१७ रोजी परिपत्रक काढले होते. मात्र, आपल्याच निर्णयावर अडून न राहता सरकारने एक्स्टेंडेड व अनएक्सटेंडेड अशी विभागवारी करावी अशी याचिका कोर्टात ३१ मार्च २०१७ रोजी सादर केली. ही याचिका सर्वोच्च न्यायालय व इतर सहा उच्च न्यायालयांनी रद्द केली. तरी देखील सरकारने सर्वोच्च न्यायालयात याबाबत पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. त्यास्तव सरकारने ही पुनर्विचार याचिका रद्द करावी व निवृत्त कर्मचारी व कार्यरत कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा विचार करण्याचे आवाहन निवृत्त कर्मचारी (१९९५) समन्वय समितीतर्फे समितीचे राष्ट्रीय कायदे सल्लागार दादा झोडे व राष्ट्रीय महामंत्री प्रकाश पाठक यांनी पंतप्रधानांना केले आहे.५० हजार कोविड अनुदान द्यावेनिवृत्त कर्मचाऱ्यांना पाचशे ते हजार रुपये पेनशन मिळत आहे. त्यातही पुनर्विचार याचिकेमुळे ही पेन्शन रद्द करण्यात आली आहे. त्यात कोरोनाचा प्रादुर्भाव निर्माण झाला आणि कर्मचाऱ्यांची समस्या आणखीच वाढली आहे. त्यामुळे सरकारने याचिका मागे घेऊन अशा कर्मचाऱ्यांना ५० हजार रुपये कोविड अनुदान निवृत्त कर्मचाऱ्यांना द्यावे आणि एक लाख रुपये अ‍ॅडव्हान्स म्हणून देण्यात यावे, अशी मागणी प्रकाश पाठक यांनी केली आहे. एक लाख रुपये अ‍ॅडव्हान्स भगतसिंह कोशियारी कमिटीने केलेल्या कायदा दुरुस्तीतून ही रक्कम नंतर कपात करून घ्यावी, असे ते म्हणाले.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार