शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

‘दलित’ शब्दाचा उपयोग थांबविण्याबाबत शासन अनुकूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 23:55 IST

शासकीय अभिलेखांतून दलित शब्द वगळणे आणि भविष्यामध्ये या शब्दाचा उपयोग थांबविण्याबाबत राज्य शासन सकारात्मक विचार करीत असल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला बुधवारी देण्यात आली.

ठळक मुद्देहायकोर्टात माहिती१२ डिसेंबरला बैठक घेण्याचा आदेश

आॅनलाईन लोकमतनागपूर : शासकीय अभिलेखांतून दलित शब्द वगळणे आणि भविष्यामध्ये या शब्दाचा उपयोग थांबविण्याबाबत राज्य शासन सकारात्मक विचार करीत असल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला बुधवारी देण्यात आली.दलित शब्दाचा उपयोग थांबविण्यासाठी राज्य शासनाला अनेक पत्रे प्राप्त झाली आहेत. यासंदर्भात उच्च न्यायालयात पंकज मेश्राम यांची जनहित याचिकाही प्रलंबित आहे. त्यामुळे शासनाने या विषयावर गांभिर्याने विचार करायला सुरुवात केली आहे. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने या विषयावर सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत येत्या १२ डिसेंबर रोजी बैठक घेण्याचा आदेश दिला. तसेच, बैठकीमध्ये याचिकाकर्ते पंकज मेश्राम व त्यांचे वकील अ‍ॅड. शैलेश नारनवरे यांना बाजू मांडण्याची अनुमती दिली.सर्वोच्च न्यायालयाने ‘एस.पी. गुप्ता वि. राष्ट्रपती’ या प्रकरणामध्ये शासकीय अभिलेखातून ‘दलित’ शब्द काढून टाकण्याचे निर्देश दिले होते. तसेच, लता सिंग वि. उत्तर प्रदेश शासन व अरुमुगम सेरवाई वि. तामिळनाडू शासन प्रकरणामध्ये ‘दलित’ शब्द घटनाबाह्य असल्याचे म्हटले आहे. अनुसूचित जाती आयोगाचेही हेच मत आहे. ‘दलित’ शब्द भेदभावजनक, आक्षेपार्ह व जातीवाचक आहे. परिणामी, ‘दलित’ शब्दाऐवजी अनुसूचित जाती किंवा नवबुद्ध शब्दाचा सर्वत्र वापर करण्यात यावा असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.