शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी शासन कटिबद्ध :  जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 22:24 IST

व्यापाऱ्यांचा माल कोणत्याही सीमेवर पोलिसांनी थांबविल्यास जिल्हाधिकाऱ्यांची हेल्पलाईन ०७१२-२५६२६६८ या क्रमांकावर संपर्क करून समाधान होणार आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी शासन कटिबद्ध असून संपूर्ण सहकार्य करीत असल्याचे मत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्देव्यापाऱ्यांनी हेल्पलाईनची मदत घ्यावी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : व्यापाऱ्यांचा माल कोणत्याही सीमेवर पोलिसांनी थांबविल्यास जिल्हाधिकाऱ्यांची हेल्पलाईन ०७१२-२५६२६६८ या क्रमांकावर संपर्क करून समाधान होणार आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी शासन कटिबद्ध असून संपूर्ण सहकार्य करीत असल्याचे मत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी येथे व्यक्त केले. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची शनिवारी बैठक घेतली. बैठकीत पालकमंत्री नितीन राऊत यांनी मोबाईल स्पीकरवरून बातचीत केली आणि व्यापाऱ्यांतर्फे प्रशासनाला मदत करण्यासाठी आभार मानले. संकटसमयी लोकांची सेवा करावी आणि माल योग्य व किफायत दरातच विकावा, असे आवाहन राऊत यांनी व्यापाऱ्यांना केले.जिल्हाधिकारी म्हणाले, हेल्पलाईन क्रमांकावरून व्यापाऱ्यांचे समाधान करून सहकार्य करण्यात येणार आहे. व्यापाऱ्याला आपला माल देशाच्या कोणत्याही शहरात पाठवायचा असेल तर जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी कुंभारे यांच्या मोबाईलवर संपर्क साधावा. या माध्यमातून कार्यालयातून संबंधित पास आणि आरटीओकडूनही पास देण्यात येईल. स्टीकर वा बॅनर लावलेला ट्रक थांबविला जाणार नाही. नागपूरच्या आसपास माल घेऊन जाणारे ट्रान्सपोर्ट सुरू करण्यात येईल. जीवनाश्यक वस्तूंच्या नियमित पुरवठ्यासाठी शासन मदत करेल. ते म्हणाले, शासनातर्फे ५० हजार कुटुंबीयांना रेशनचे पॅकेट बनवून देण्यात येणार आहे. मालाच्या पुरवठ्यासाठी शासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन व्यापाऱ्यांनी यावेळी दिले.बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी आशा पठाण व कुंभारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसचिव प्रशांत नेरकर, होलसेल ग्रेन अ‍ॅण्ड सीड्स मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष संतोषकुमार अग्रवाल, सचिव प्रताप मोटवानी, सहसचिव पवन पोद्दार, ऑईल मिल असोसिएशनचे अध्यक्ष राजूभाई ठक्कर, सचिव परमानंद मोतीयानी, किराणा असोसिएशनचे अध्यक्ष रामदास वजानी, दाल मिल असोसिएशनचे दिलीप शाह, किराणा असोसिएशनचे सचिव शिवप्रताप सिंह, हजारीलाल नागपाल, भरत ठक्कर, संजय सूचक आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Nagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालय