शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय आयुर्वेद महाविद्यालय : तीन वर्षांपासून वनौषधी उद्यानाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 00:36 IST

भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेच्या (सीसीआयएम) मानकानुसार शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयात वनौषधी उद्यान असणे आवश्यक असते. परंतु तीन वर्षे होऊनही अद्यापही जागा मिळाली नसल्याने महाविद्यालय उद्यानापासून वंचित आहे.

ठळक मुद्देचार एकर जागेची केली होती मागणी

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेच्या (सीसीआयएम) मानकानुसार शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयात वनौषधी उद्यान असणे आवश्यक असते. शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाने या उद्यानाचा प्रस्ताव केंद्राकडे पठाविला होता, याला मंजुरी मिळून निधीही उपलब्ध झाला होता. परंतु पाण्याचा तुटवडा, प्रस्तावित बांधकाम यामुळे हा निधी परत पाठवून शासनाला कॉलेजबाहेरील चार एकर जागा उद्यानासाठी मागितली होती. परंतु तीन वर्षे होऊनही अद्यापही जागा मिळाली नसल्याने महाविद्यालय उद्यानापासून वंचित आहे.शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात यावर्षीपासून पदवीचे (यूजी) १२५, तर पदव्युत्तरचे (पीजी) ८४ विद्यार्थी प्रवेशित आहेत. दरवर्षी एवढ्याच जागेवर विद्यार्थ्यांचा प्रवेश व्हावा, यासाठी ‘सीसीआयएम’च्या मानकानुसार महाविद्यालयात वनौषधी उद्यान असणे गरजेचे आहे. कारण, या उद्यानातून विद्यार्थी स्वत: वनौषधी तयार करण्यास शिकतात. म्हणून आयुर्वेद प्रशासनाने वनौषधी उद्यान (मेडिशनल प्लान्ट गार्डन) निर्मितीसाठी ३० लाख रुपयांचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला होता. यात पहिल्या टप्प्यातील पाच लाख रुपये केंद्राने उपलब्ध करून दिले होते. महाविद्यालयाचा एकूण परिसर १५ एकराचा आहे. यातील अडीच एकरात वनौषधी उद्यानाची निर्मिती केली जाणार होती. उद्यान निर्मितीसंदर्भात दिल्लीच्या समितीने जागेची पाहणी केली होती. याशिवाय उद्यानासंदर्भात काही महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या होत्या. परंतु या प्रस्तावाच्या मंजुरीला लागलेला उशीर तोपर्यंत मुलामुलींच्या प्रस्तावित वसतिगृहाला मिळालेली मंजुरी व पाण्याच्या समस्येमुळे महाविद्यालय प्रशासनाने मिळालेला निधी परत केला. महाविद्यालयाच्या बाहेर चार एकर जागा उद्यानासाठी उपलब्ध करून देण्याच्या मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना दिला. परंतु याला तीन वर्षांचा कालावधी होऊन अद्यापही जागा मिळाली नसल्याने महाविद्यालय प्रशासन अडचणीत आले आहे. ‘सीसीआयएम’ याची त्रुटी काढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उद्यानाच्या जागेसाठी प्रस्तावशासकीय आयुर्वेद महाविद्यालयात वनौषधी उद्यानासाठी जागा अपुरी पडत आहे. यामुळे २०१५-१६ मध्ये महाविद्यालयाबाहेरची चार एकर जागा उद्यानासाठी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव पाठविला होता. उद्यान निर्माण झाल्यास याचा फायदा विद्यार्थ्यांना होऊन ‘सीसीआयएम’ त्रुटीही काढणार नाही.डॉ. गणेश मुक्कावारअधिष्ठाता, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय

टॅग्स :Government ayurvedic college nagpurशासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय, नागपूरmedicineऔषधं